आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव, रावेरमधून लढण्यासाठी भाजपकडून 32 जण आहेत इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारीत आघाडी घेतली आहे. प्रदेशाकडून नियुक्त निरीक्षकांनी जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रातून तब्बल 67 इच्छुकांनी हजेरी लावली. यात चाळीसगाव व रावेर मतदारसंघातून प्रत्येकी 16 जणांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.

जळगाव शहर : चंद्रकांत बेंडाळे, वामनराव खडके, सुरेश भोळे, अशोक लाडवंजारी, सुनील बढे, सुनील माळी, जळगाव ग्रामीण : पी.सी.पाटील, सुभाष देवराम पाटील, कमलाकर रोटे, प्रभाकर पवार, राजू उत्तमराव सोनवणे, मनोरमा पाटील.

चाळीसगाव : देवयानी ठाकरे, डॉ. संजीव पाटील, कैलास सूर्यवंशी, रवींद्र चुडामण पाटील, रामदास मोतीराम पाटील, संभाजी शिवाजीराव पाटील, डॉ. सुभाष निकुंभ, अविनाश दौलतराव सूर्यवंशी, वाडिलाल परशुराम राठोड, सतीश रघुनाथ दराडे, उद्धवराज महाजन, राजेंद्र राठोड, उन्मेश भय्यासाहेब पाटील, लीलाताई संभाजी पाटील, राजेंद्र रामदास चौधरी, लालचंद बजाज.
अमळनेर : अनिल भाईदास पाटील, जयश्री अनिल पाटील, स्मिता उदय वाघ, शिरीष हिरालाल चौधरी.
एरंडोल : अ‍ॅड.अतुल नीळकंठ मोरे, रवींद्र भोमा पाटील, भिका रामदास कोळी, प्रा.आर.जी.पाटील, नरेंद्र भिकनराव पाटील, अनिल छबीलदास चौधरी.
भुसावळ : राहुल रमेश मकासरे, राजेंद्र एकनाथ गुरचळ, प्रभाकर जाधव, संघरत्न महेंद्र सपकाळे.
जामनेर : आमदार गिरीश महाजन.
मुक्ताईनगर : विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे.
रावेर : हरिभाऊ जावळे, हेमांगी राजेंद्र चौधरी, शोभा विलास पाटील, मिलिंद शंकरराव वाघुळदे, सुरेश धनके, सुरेश पाटील, कोकिळा सुरेश पाटील, नंदकिशोर भागवत महाजन, हर्षल गोविंदा पाटील, नीळकंठ शंकर नारखेडे, पद्माकर महाजन, राजेंद्र कडू पाटील, रोहिदास ढाके, भरत महाजन, श्रीकांत सरोदे, डॉ. विजय धांडे.
चोपडा : अ‍ॅड. नितीन देवराज, मीना तडवी, जगन्नाथ बाविस्कर, मगन बाविस्कर, नंदाबाई ताराचंद पवार, सोन्या ईश्वर कोळी.

आमदार चैनसुख संचेती अन् चंद्रकांत बावनकुळे यांनी केली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील पाच मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. पक्षाच्या वतीने प्रदेश कोअर कमिटीच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी आमदार चैनसुख संचेती व आमदार चंद्रकांत बावनकुळे हे मंगळवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील सर्व 11 जागा जिंकून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. सहसंघटन मंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक माहिती व बूथ रचनेची माहिती दिली.