आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 33 Thousand People Does Not Have Voting Card In Bhusawal

भुसावळ तालुक्यात 33 हजार मतदार छायाचित्रांविना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - महसूल विभागातर्फे मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू आहे. मात्र भुसावळ येथील 100 बीएलओंनी त्यांच्याकडील याद्याच अद्याप तहसील कार्यालयात जमा केल्या नसल्याने मतदार याद्या अद्ययावतीकरणाच्या कामाला खीळ बसली आहे. अद्यापही 33 हजार 500 मतदारांचे छायाचित्र मतदार याद्यांवर नसल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मतदारांचे यादीवर छायाचित्र नाही, अशा मतदारांचे छायाचित्र मिळवून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम बीएलओंकडे सोपवण्यात आले आहे. या कामासाठी 31 मेपर्यंतची मुदत होती. मात्र, अद्यापही मतदारांचे छायाचित्र जमवण्याचे काम अपूर्ण आहे. तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी 247 बीएलओंची नियुक्ती महसूल विभागाने केली होती. त्यापैकी 100 बीएलओंनी त्यांच्याकडील याद्या अद्यापही जमा केलेल्या नाहीत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे.


मतदारयाद्या जमा करण्याचे आदेश
ज्या बीएलओंकडे अद्यापही मतदार याद्या आहेत त्यांना लेखी पत्र देऊन याद्या तत्काळ जमा करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. त्यामुळे कामाला गती मिळेल. वैशाली हिंगे, तहसीलदार, भुसावळ