आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३४१ काेटी भरण्यास दिली स्थगिती, जळगाव मनपाला दिल्लीच्या डीअारएटी न्यायालयाकडून दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबईच्या डीअारटी न्यायालयाने काढलेल्या ३४१ काेटींच्या डिक्री (हुकूम) अादेशाला दिल्ली येथील डीअारएटी न्यायालयाने स्थगिती दिली अाहे. मात्र, ही स्थगिती देताना जळगाव महानगरपालिकेने हुडकाेकडे दर महिन्याला काेटी रुपये भरावेत, असे निर्देश कायम ठेवले अाहे.

मनपाने हुडकाेकडून सुमारे १४१ काेटी रुपयांचे कर्ज घेतले हाेते. मात्र, कर्जाचे हप्ते थकले हाेते. यामुळे १३ एप्रिल २०१५ राेजी हुडकाेने डीअारटी न्यायालयाच्या माध्यमातून ३४१ काेटी रुपये व्याजासह भरण्याची डिक्री अाॅर्डर काढली हाेती. पैसे भरा; अन्यथा बँक खाते मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असे अादेश दिले हाेते. या अादेशाविरुद्ध मनपाने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली हाेती. त्यात न्यायालयानेचर्चेतून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या हाेत्या. शेवटी पालिकेने दिल्ली येथील डीअारएटी धाव घेतली. मनपाच्या याचिकेवर न्यायाधीश रणजितसिंग यांच्यासमाेर साेमवारी सुनावणी झाली. त्यात मुंबई डीअारटी न्यायालयाने काढलेल्या ३४१ काेटींच्या डिक्री अाॅर्डरला स्थगिती दिली. तसेच पालिकेने हुडकाेकडे दर महिन्याला काेटी रुपये भरावेत ,असे निर्देशही दिले अाहेत. अाता पुढील सुनावणी मे राेजी हाेणार अाहे. पालिकेच्या वतीने अॅड. राजीव नेरा अॅड. जितेंद्र गायकवाड यांनी बाजू मांडली, तर हुडकाेच्या वतीने अॅड. अजितकुमार यांनी युक्तिवाद केला. या वेळी पालिकेचे मुख्य वित्त अधिकारी चंद्रकांत खरात हेदेखील उपस्थित हाेते.

असा हाेईल फायदा
>डीअारटी काेर्टाचे रिकव्हरी अाॅफिसर काेणतीही कारवाई करू शकणार नाहीत.
>पालिकेच्या सतरा मजलीसह इतर मालमत्ता सील हाेण्याची कारवाई टळणार.
>एकरकमी परतफेडीसाठी शासकीय पातळीवर गती देता येणार.