आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधून मराठा क्रांती माेर्चासाठी 35 हजार मराठा बांधव रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई येथे बुधवारी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती माेर्चासाठी जळगाव जिल्ह्यातून सुमारे ३५ हजार समाज बांधव मुंबईत रवाना झाले अाहेत. रेल्वे खासगी वाहनांनी मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईला गेल्याचे समन्वयक डी.डी. बच्छाव यांनी दिव्य मराठीला सांगितले. 
 
माेर्चाला जाण्याचे नियाेजन करण्यासाठी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत सुमारे ७० ते ८० हजार समाज बांधव माेर्चाला जाण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता गरीब रथ एक्स्प्रेसने दाेन जणांचा एक गट रवाना झाला. दिवसभर विविध रेल्वेने मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले अाहेत. या शिवाय सुमारे २५० खासगी वाहनांनी समाज बांधव मुंबईत दाखल झाले असून अजूनही काही गाड्या येत असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. तर, जिल्ह्यातून ३५ हजार समाजबांधव माेर्चासाठी रवाना झाले अाहेत. त्यानंतरही रात्री उशीरा आणखी काही समाजबांधव मुंबईला रवाना झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...