आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरे प्रकरणाचा अहवाल फुटल्याबाबत ३६ तक्रारी, लोकशाहीदिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिस निरीक्षक अशोेक सादरे आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांचा अहवाल एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर फुटला हाेता. याबाबत पोलिस अधीक्षकांकडे ३६ वेळा तक्रारी करूनही एक ओळीचेही उत्तर देण्यात आले नाही. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करावी, अशी तक्रार शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी साेमवारी लोकशाहीदिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांचा अहवाल २५ ऑक्टोबर रोजी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आला होता. राज्याचे पोलिस महासंचालक यांनी व्हॉट्सअॅपवरदेखील तक्रारी घेण्यात येतील, असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक यांना जवळपास ३६ वेळा अहवाल फुटीबाबत तक्रारी पाठवल्या आहेत. परंतु, आजतागायत माझ्या तक्रारीस एका ओळीचे उत्तर किंवा तक्रारीची एक प्रतही मिळालेली नाही. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास २४ तासांत तक्रारीची प्रत देणे आवश्यक आहे, असे असताना ४१ दिवस उलटूनही मला तक्रारीची प्रत मिळालेली नाही. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालय पोलिस महासंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन झालेले आहे. तसेच त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यालयीन कारवाई करण्यात यावी अशी मागणी असे मालपुरे यांनी लाेकशाही दिनातील तक्रार अर्जात केली अाहे.