आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळा संपत असतानाही जळगावात 36 गावांना टँकर, 96 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पावसाळा संपत असतानाही जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम अाहे. जिल्ह्यातील ३६ गावांना टँकर सुरू अाहे. तसेच ९४ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण तर ११ गावांमध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा याेजना सुरू केल्या अाहेत. दरवर्षी अाॅक्टाेबर महिन्यात संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जाते. 
 
अर्धा सप्टेंबर संपल्यानंतरही जिल्ह्यात पावसाची सरासरी ६० टक्के अाहे. प्रकल्पांमधील साठा ४० टक्क्यांच्या अात असून यात लघु प्रकल्पांमधील स्थिती चिंताजनक अाहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, स्त्राेतांमध्ये पाणीसाठा नसल्यामुळे एेन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईच्या याेजना सुरू कराव्या लागल्या अाहेत. ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात अाहे. यात अमळनेरमधील २३ गावे, जामनेरमधील गावे, पाराेळा २, बाेदवड २, भुसावळ १, जळगाव तालुक्यातील एका गावाचा समावेश अाहे. ९४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात अाले अाहे. ११ गावांमध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करण्यात अाल्या अाहेत. ७१ गावांमध्ये १४० नवीन विंधन विहिरी, २६ गावांमध्ये ३८ नवीन कूपनलिका, गावांमध्ये विहिर खाेलीकरणांची कामे हाती घेण्यात अाली अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...