आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3,866 Crores Loan Planing Sanction In Collector's Meeting

जिल्हाधिका-यांच्या बैठकीत 3,866 कोटींचा कर्ज आराखडा मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आगामी आर्थिक वर्षाचा जळगाव जिल्ह्यासाठी 3,866 कोटी 50 लाख रुपयांचा कर्ज आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या आराखड्याला बुधवारी मंजुरी देण्यात आली. कर्जवाटप धोरणात सर्वाधिक प्राधान्य पीक कर्जाला देण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी एक हजार कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला दीड हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर एकंदरीत पतपुरवठय़ात तब्बल 800 कोटींची गेल्या वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षासाठी वाढ करण्यात आली आहे.

गत वर्षात बॅँकांना 3 हजार 46 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र सर्व बॅँका मिळून केवळ 66 टक्के उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. दरम्यान, डिसेंबरपर्यंत केलेल्या कर्जवाटपाचा या वेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सीईओ शीतल उगले, रिझर्व्ह बॅँकेचे एजीएम आर.व्ही.पंचगम, सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाचे डी.के.निकम, लीड बॅँकेचे मुख्य प्रबंधक अविनाश आठले उपस्थित होते. पीककर्ज देण्यास फारशा उत्सुक नसलेल्या राष्ट्रीयकृत बॅँकांना या वर्षीही कमीच उद्दिष्ट दिले आहे. गत वर्षी उद्दिष्ट पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी राष्ट्रीयकृत बॅँकांबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षात एकूण 1,315 कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; प्रत्यक्षात 1,637 कोटींचे कर्ज देण्यात आले. त्यात एकट्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा वाटा 1,260 कोटींचा होता. येत्या आर्थिक वर्षात एकूण कर्जवाटप आराखड्यात वाढ करण्यात आली आहे.


आगामी वर्षांचा आराखडा

एकूण कर्ज 3,866 कोटी 50 लाख रुपये

पीक कर्जपुरवठा 1,874 कोटी 74 लाख

पीक कर्ज (जिल्हा बॅँक) 1,427 कोटी

मुदत कर्ज (शेती) 472 कोटी 93 लाख

लघुउद्योग- 991 कोटी 9 लाख

इतर कर्ज- 557 कोटी 74 लाख


अर्थसंकल्पातील धुळ्यातील तीन मध्यमप्रकल्पांसाठी 36 कोटी 67 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्यात जामखेडी 5 कोटी, वाडी शेवाडी 22 कोटी 57 लाख, प्रकाशा 9 कोटी 1 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंदुरबारसाठी 29 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यात दरा, देहली, कोरडीनाला आत्रण नागन प्रकल्पाचा समावेश आहे.

मोठय़ा प्रकल्पावरचा निधी घटविला.
गत वर्षी 113 कोटी मोठय़ा प्रकल्पांना देण्यात आले. निम्मतापी प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद झाल्याने हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. कुर्‍हा काकोडा उपसा सिंचन योजनेला 20 कोटी तर बोदवड योजनेला 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या वर्षात 7 मोठय़ा प्रकल्पांसाठी 89 कोटी 6 लाख रुपये निधी देण्यात येणार आहे.

धुळे मध्यमप्रकल्प 36 कोटी

मध्यम प्रकल्पांमध्ये 20 कोटींची वाढ झाली आहे. अंजनी, बहुळा, शेळगाव बॅरेज, पद्मालय या योजनांसाठी ठोस निधी देण्यात आला आहे. लघु प्रकल्पांसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद वाढविण्यात आली आहे. गेल्या वर्षी 37 कोटी रुपये असलेली तरतूद 59 कोटी केली आहे.