आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियोजनबद्ध पद्धतीने रचला वसुलीच्या हल्ल्याचा कट, लीला पार्क प्रकरणी 4 हल्लेखोरांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मोबाइल हप्त्यातील केवळ १०० रुपयांच्या वसुलीसाठी थेट तलवारीने हल्ला करण्याचा कट हा अत्यंत नियोजनबध्द रितीने आखण्यात आला होता असे मंगळवारी स्पष्ट झाले.सोमवारी रात्री लीला पार्क भागात वसुली कर्मचाऱ्याच्या २५ ते ३० जणांच्या टोळक्याने लीला पार्क भागातील कुटुंबावर हल्ला केला होता.या प्रकरणी चार हल्लेखोरांना मंगळवारी अटक करण्यात आली. 

 

लीला पार्क भागातील ललित चौधरी याने घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील १०० रूपये शिल्लक राहिल्याच्या वादातून हा हल्ला झाला होता. फायनान्सचा कर्मचारी प्रवीण वाघ याने सुरूवातीला ललित सोबत वाद घातला. त्यानंतर काही वेळात २५-३० टवाळखोरांना सोबत आणून ललित त्याच्या मित्रांवर तलवारीने हल्ला चढवला होता. 


हल्लेखोरांनी जळगाव-भुसावळ महामार्गावरील दोन हॉटेल्सच्या बाहेर रिक्षा दुचाकी उभ्या केल्या होत्या. दोन रिक्षांमधून १५ ते २० जण हातात लाठ्याकाठ्या, तलवारी घेऊन उतरले. तर काही जण दुचाकींवरून आले होते. रस्त्याच्या कडेला रिक्षा, दुचाकी उभ्या केल्यानंतर शिवीगाळ करीत ते लीला पार्कमध्ये शिरले. सर्वात आधी ललितच्या घरावर हल्ला करुन वस्तूं्ची तोडफोड केली. ललितसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला चढवला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या तीन तरुणांवर देखील प्राणघातक हल्ला त्यांनी केला. या प्रकरणी संगीता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात १४ हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी {उर्वरित.पान 

 

नगरसेवक नाही, नामसाधर्म्यामुळे घोळ 
यागुन्ह्यात हल्लेखोरांपैकी १२ व्या क्रमांकाच्या संशयिताचे नाव अश्विन सोनवणे असे आहे. परंतु नामसाधर्म्यामुळे मंगळवारच्या ‘दिव्य मराठी’ अंकामध्ये अनवधानाने ‘नगरसेवक अश्विन सोनवणे’ असे नाव प्रसिद्ध झाले होते.वास्तविक हल्लेखोर अश्विन सोनवणे हा मेहरूण भागात राहणारा २० वर्षीय तरुण आहे. तो वाघ याच्या सांगण्यावरून चौधरी याच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेला होता. 

बातम्या आणखी आहेत...