आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात आढळले डेंग्यूचे चार रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेत डेंग्यूचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर संबंधित परिसरात धुरळणी करण्यात आली.

महापालिकेतर्फे शहरात डासांच्या निर्मूलनासाठी नियमित सर्वेक्षण सुरू आहे. त्यात फवारणी, कंटेनर तपासणी, डासांचे सर्वेक्षण, ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जेथे रुग्ण आढळले त्याच ठिकाणी केवळ फॉगिंग करण्यात येते. तसेच मलेरिया विभागातर्फे जानेवारी ते जुलैदरम्यान ताप सर्वेक्षण करण्यात आले.
त्यात रक्ताचे 60 नमुने घेण्यात आले. तपासणीअंती चार नमुने डेंग्यूसदृश आढळले. त्यामुळे त्या घरातील व आजूबाजूच्या नागरिकांचे रक्ताच्या नमुने घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल निरंक आला आहे. कंटेनर सर्वेक्षणासाठी 35, गप्पीमासे सोडण्यासाठी आठ, ताप सर्वेक्षणासाठी नऊ आणि शहरातील खासगी रुग्णालयात मलेरिया, डेंग्यूचे कोणी रुग्ण आहेत आहे का, याचा रिपोर्ट घेण्यासाठी एक अशा प्रकारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.