आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सुरू होणार ४-जी वायफाय सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावशहरात लवकरच सात ठिकाणी ४-जी वायफाय सेवा सुरू होणार आहे. या वायफाय सेवेत पहिली २० मिनिटे मोफत देण्यात येणार आहेत. यासंदर्भात एका खासगी दूरसंचार कंपनीने जळगाव मनपाला प्रस्ताव दिला आहे.

महापालिकेच्या मालमत्तांमध्ये फ्री वायफाय झोन तयार करण्यासाठी या दूरसंचार कंपनीला डिव्हायसेस बसवण्यासाठी महापालिकेच्या मालकीचे पोल तसेच इमारतींचा वापर करण्याची परवानगी हवी आहे. पालिका प्रशासन लवकरच या संदर्भात निर्णय घेईल, असे उपायुक्त प्रदीप जगताप यांनी सांगितले.

या सुविधेत सुरुवातीचे २० मिनिटे ही वायफाय सेवा मोफत राहील. १०० मीटर परिसरात इंटरनेटचा वापर करणाऱ्याला वायफाय सेवा सुरू करताच मनपाचे होम पेज दिसेल.
ही आहेत सात ठिकाणे

काव्यरत्नावली,गोलाणी मार्केट, बहिणाबाई उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, ख्वाजामियाँ, आकाशवाणी, एम.जे.कॉलेज.