आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन समाजाला न्याय्य हक्क देता का सत्तेबाहेर जाता? 4 युवतींनी भाषणातून दिला आक्रमकपणे इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाबासाहेबांचे रक्त आमच्या अंगात सळसळतेय, अन्याय सहन करणार नाही अन् सहनही करू देणार नाही. सत्ता कुणाचीही असो कायदा आमच्या बापाचाच आहे. सत्तेच्या सारिपाटासाठी बहुजनांचा वापर करून त्यांना न्यायापासून वंचित ठेवले जाते आहे. काय चाललय या महाराष्ट्रात? असा संतप्त सवाल करीत बहुुजनांना न्याय देता की, सत्तेबाहेर जाता? असा इशारा बहुजन क्रांती मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत युवतींनी दिला. सभेत व्यासपीठावर बहुजन समजाच्या १४ युवती आल्या हाेत्या. त्यापैकी दीपाली पेंढारकर, अॅड. सुवर्णा भारुडे, फिजा सय्यद जहागीर आणि भाग्यश्री ठाकरे या युवतींनी अत्यंत आक्रमकपणे मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. 

 
फिजा सय्यद जहाँगीर : मल्टिकल्चरनेशन असलेल्या देशात काही ठेकेदार देशाच्या संपत्तीवर मजा मारत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमध्ये हस्तक्षेप करण्यात येत आहे. न्याय द्यायचा असेल तर रोहील वेमुलाला द्या, काश्मीरमधील हिंदुस्थानींना द्या. ज्या बहुजनांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना केवळ टक्के आरक्षण देण्यात आले. मुस्लिमानांना हिंदुस्थानी होण्याचा पुरावा मागितला जात आहे. नोकऱ्या दिल्या जात नाहीत. नोकऱ्या देणाऱ्यांच्या डोळ्यावर लाल चष्मा आहे. “सबका साथ, सबका विकास’चे खोटे दावे केले जात आहेत. शेवटी एकच सांगते, “जुल्म के हुनर आजमाये हमपर, जुल्म भी सहे, और जालीम कहलाए गये।’ 

भाग्यश्री ठाकरे : युतीबहुजनांना न्यायापासून वंचित का ठेवत आहे. काय चाललंय या महाराष्ट्रात? असा प्रश्न उपस्थित केला. सत्तेच्या सारिपाटासाठी बहुजनांचा वापर करायचा अन् त्यांना न्यायापासून वंचित ठेवायचे, अशी राज्यकर्त्यांची भूमिका आहे. मोर्चाचे निवेदनातील गांभीर्य ओळखून बहुजनांना न्याय देता की सत्तेबाहेर जाता, असा इशाराही दिला. 

अॅड. सुवर्णा भारुडे : अॅट्रॉसिटीकायद्याची कडक 
अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांनाही अाम्ही सोडणार नाही. त्यांनाही कडक शासन व्हावे, अशी आमची भूमिका आहे. बहुजन समाजाला न्याय मिळवण्यासाठी आता इतिहासाची जाणीव करून द्यावी लागेल. बाबासाहेबांचे रक्त आमच्या अंगात सळसळतेय. अन्याय सहन करणार नाही अन् सहनही करू देणार नाही. अन्याय करणारा कोणत्याही जाती-धर्माचा असो, आता माघार घ्यायची नाही नी घाबरायचे ही नाही. 

दीपाली पेंढारकर : यायुवतीने सर्वांना क्रांतिकारी जयभीम करीत मनोगताला सुरुवात केली. सत्ता कुणाचीही असू द्या, कायदा आमच्या बापाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून लढण्याचे संघर्ष करण्याचे बाळकडू दिले अाहे. मनुवाद्यांच्या छातीवर लाथ मारली. समाजासाठी झटणारा नेता दिला. बहुजनांना न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. आमच्या मागण्यासांठी एवढ्या मोठ्या संख्येने बहुजन एकत्र जमले आहेत. ही एकता अशीच ठेवून आता माघार कदापि घ्यायची नाही.