आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक नियम माेडणाऱ्यांना 4 हजारांपर्यंत दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाहतूकनियमांचे उल्लंघन केल्यास आता ५० ते 4 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे माेटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम २००मधील तरतुदीनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात येतो. दंडाच्या या तडजाेड रकमेच्या शुल्कात वाढ करण्यात अाली अाहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात अाली अाहे. ७१ प्रकारच्या दंडात ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात अाली अाहे.
नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार त्यानंतर कलम मग कंसात तडजाेड रक्कम अाहे. विनापरवाना वाहन चालवणे कलम ३(१) १८१ (तडजाेडीची रक्कम हजार रुपये), १६ वर्षांखालील मुलाने बिगरगिअरचे वाहन चालवणे कलम ४(१) १८१ (१ हजार रुपये), नाेंदणी केल्याशिवाय वाहन चालवणे (मोटारसायकल) कलम ३९/१९२(१) (२ हजार रुपये), नाेंदणी केल्याशिवाय वाहन चालवणे (मोटारसायकल व्यतिरिक्त) कलम ३९/१९२(१) (४ हजार रुपये), नंबरप्लेटशिवाय, फॅन्सी नंबरप्लेट, नंबरप्लेटवर पाेलिस, अार्मी लिहिणे कलम ५१/१७७ (१ हजार रुपये), वाहनास रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसणे कलम २२९(२)/१७७ (१ हजार रुपये), हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे कलम १२९/१७७ (५०० रुपये), सीट बेल्ट लावता वाहन चालवणे कलम १३८(३)/१७७ (२०० रुपये), वाहन चालवताना माेबाइलचा वापर करणे कलम २५०(अ)/१७७ (२०० रुपये), वाहनावर प्रेस, पाेलिस लिहिणे कलम १३४(६)/१७७ (२०० रुपये), मोटारसायकल ट्रिपलसीट चालवणे कलम १२८/१७७ (२०० रुपये), सिग्नल कटिंग, प्रवेशबंदी, नाे-पार्किंगमध्ये वाहन लावणे कलम ११९/१७७ (२०० रुपये), चालकास अडथळा हाेईल असे प्रवासी बसवणे (फ्रंटसीट) कलम १२५/१७७ (२०० रुपये), अवैध प्रवासी वाहतूक करणे (परवान्याचे उल्लंघन करणे) कलम ६६(१)/१९२(अ) (४ हजार रुपये), प्रेशर हॉर्न वाजवणे कलम ११९(२)/१९०(२) (१ हजार रुपये), सायलेन्सर काढून वाहन चालवणे कलम १२/१९०(०) (१ हजार रुपये), गणवेशातील पाेलिसाने थांबण्याचा इशारा केल्यानंतर थांबणे कलम १३२/१७९ (५०० रुपये), मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे कलम ११२/१८३(१) (१ हजार रुपये) आदी प्रमाणे कारवाई होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...