आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छरदाणी कापून पॅन्टच्या खिशातील रोकड लांबवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातील गाेंदूर राेडवरील इंद्रप्रस्थ काॅलनीत घराच्या बेडरूमच्या खिडकीला लावलेली मच्छरदाणी कापून अज्ञात चाेरट्याने पॅन्टमध्ये असलेले राेख ४० हजार रुपये चाेरल्याचा प्रकार घडला. 
 
इंद्रप्रस्थ काॅलनीतील प्लाॅट नं. १३३मध्ये गणेश मधुकर साेनवणे यांचे निवासस्थान अाहे. काल रविवारी रात्री ते घरात अापल्या परिवारासह झाेपले हाेते. रात्री साडेबारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घराच्या बेडरूमच्या खिडकीला लावलेली मच्छरदाणी कापून हाताने घरातील पॅन्ट बाहेर काढली. पॅन्टमध्ये राेख ४० हजार रुपये हाेते. त्यात दाेन हजारांच्या पाच अाणि ५०० रुपयांच्या ६० नाेटा हाेत्या. सकाळी उठल्यानंतर खिडकीची मच्छरदाणी कापल्याचे पॅन्ट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात अाले. याबाबत गणेश साेनवणे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक उपनिरीक्षक बी. अार. पिंगळे करीत अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...