आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते, उड्डाणपुलासाठी ४१५ काेटींचा निधी, जळगावसाठी केंद्राकडून मदत मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतचे समांतर रस्ते, तीन उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ४१५ काेटी रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. या कामांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. त्यात जळगाव शहरातील महामार्गालगतचे समांतर रस्ते अाणि उड्डाणपूल बांधले जाणार अाहेत.

पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या भेटीत जळगाव शहरातील समांतर रस्ते अाणि उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले हाेते. येत्या २५ जानेवारीच्या दाैऱ्यात नितीन गडकरी स्वत: या कामाचा शुभारंभ करणार अाहेत, अशी माहिती खासदार रक्षा खडसे, अामदार सुरेश भाेळे यांनी िदली. यात एक माेठा पूल, एक रेल्वे पूल अाणि एक छाेटा पूल बांधण्यात येणार अाहे.

असे असतील उड्डाणपूल
>कालिंकामाता मंदिर ते अजिंठा चाैफुल्ली
>इच्छादेवी चाैक ते अाकाशवाणी चाैक
>प्रभात चाैक ते शासकीय तंत्रनिकेतन