आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 417 Cases Of Professional Loan, Latest News In Divya Marathi

व्यावसायिक कर्जाची 417 प्रकरणे प्रलंबित, सीईओंनी घेतली बँक अधिकार्‍यांची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायासाठी बँकांकडून अर्थसाहाय्य केले जाते. मात्र, तुरळक त्रुटींवरून कर्जाची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याची ओरड वारंवार लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. सद्य:स्थितीत बचतगटांची 417 प्रकरणे प्रलंबित आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी सोमवारी डीआरडीए विभागाचा आढावा घेतला. जिल्हा सनियंत्रण व दक्षता समितीच्या बैठकीत खासदार हरिभाऊ जावळे व अन्य सदस्यांनी याविषयी ओरड केली होती. त्यानुसार ही आढावा बैठक घेण्यात आली.
बँक अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सीईओ उगले यांनी डीआरडीएचा आढावा घेताना बचत गटांची व्यावसायिक कर्जांची प्रकरणे मार्गी लावण्यासंदर्भात बँक अधिकार्‍यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी घेतली. यात बचत गटांचे 417 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली. ती मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
8 कोटींचे वाटप
जिल्हाभरातील 639 बचत गटांचे कर्जाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. 8 कोटी 56 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मार्चअखेरपूर्वी इतर प्रलंबित प्रकरणेही मार्गी लावण्यासंदर्भात विभागांना कार्यवाही करण्याच्या सूचना बॅँकेच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.