आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : चौपदरीकरण, समांतर रस्ता, भुयारी मार्गाचा 444 काेटींचा डीपीआर सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शहरातील महामार्गावरील समांतर रस्त्याच्या लढ्याला यश अाले अाहे. प्रशासनाने तातडीने जनभावना लक्षात घेऊन शहरातील महामार्गाचे सर्वेक्षण करून डीपीअार तयार करण्याचे अादेश दिले हाेते. भाेपाळ येथील एजन्सीमार्फत तयार करण्यात अालेला ४४४ काेटी लाख हजार २१२ रुपयांचा डीपीअार (डिटेल प्राेजेक्ट रिपाेर्ट) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नागपूर येथील विभागीय कार्यालयाला सादर करण्यात अाला अाहे. प्राधिकरणाच्या दिल्ली कार्यालयासह केंद्रीय मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या कामाचे टेंडरिंग हाेऊ शकणार अाहे. 
 
प्रकल्प अहवाल सादर
-एजन्सीने तया रकेलेला प्रकल्प अहवाल विभागीय कार्यालयाला सादर करण्यात अाला अाहे. पुढील प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर हाेईल. हा प्रकल्प कमी वेळेत पूर्ण करण्याचा अामचा प्रयत्न अाहे. शहराच्या विकासात त्यामुळे माेठा हातभार लागणार अाहे. अरविंद काळे, प्रकल्प संचालक, रा‌ष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 
 
जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते भुसावळ रस्त्यावरील तरसाेद फाट्यापर्यंत १५.४०८ किलोमीटरच्या महामार्गावर समांतर रस्ते, फाेर लेन काँक्रिटीकरण,फ्लाय अाेव्हर, भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, रेल्वेपूल, गिरणा नदीवरील पूल बांधला जाणार अाहे. जळगाव शहराबाहेर फाेरलेन बायपास हाेणार असल्याने त्यापूर्वीच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर शहरातील लाेकसंख्या विचारात घेऊन महामार्ग प्राधिकरणाला महामार्ग विकसित करायचा अाहे. या रस्त्यावर हाेणाऱ्या अपघातांमुळे समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून जनअांदाेलन उभे राहिले हाेते. याची दखल घेत शासन अाणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही हाती घेतली. भाेपाल येथील एल. एन. मालवीय सुपरव्हिज कन्संल्टन यांनी शहरातील महामार्गाचा ४४४ काेटी रुपयांचा डीपीअार तयार केला अाहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा 
मंगळवारी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांच्याकडे भूसंपादनाच्या निवाड्यासाठी अालेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, व्यवस्थापक अरविंद गंडी, जळगाव फर्स्टचे डाॅ.राधेश्याम चाैधरी यांच्यात महामार्गाच्या दुरुस्ती, साइडपट्ट्यांबाबत चर्चा झाली. साइडपट्ट्यांची याेग्य दुरुस्ती अाणि प्रमुख चाैकात जास्त रुंदीच्या पक्क्या साइडपट्ट्यांची मागणी केली. या वेळी समांतर रस्त्याच्या पाठपुराव्यावरही चर्चा झाली. संबंधित एजन्सीने सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची माहिती अधिकाऱ्यांनी डाॅ.चाैधरी यांना दिली. अजिंठा चाैफुल्ली, इच्छादेवी चाैकातील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी डाॅ.चाैधरी यांनी केली. दरम्यान, समांतर रस्त्यांच्या पाठपुराव्यासाठी १३ जूनपर्यंत केंद्रीय मंत्री गडकरी यांना ११९ वे ट्विट करण्यात अाले असून कामाचे टेंडर निघेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे डाॅ.चाैधरी यांनी सांगितले. 
 
असा झाला प्रवास 
जळगावकरांच्या जनअांदाेलनाच्या रेट्यामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार महामार्ग प्राधिकरणाकडून तातडीने स्वत: सर्वेक्षण करत महापालिकेच्या मदतीने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. १५ मे राेजी भाेपाळ येथील एजन्सीला डीपीअारचे काम दिले. एजन्सीने तयार केलेल्या डीपीअारमध्ये त्रुटी असल्याने प्राधिकरणाने पुन्हा २३ मे राेजी त्यांना पत्र देऊन दुरुस्त्या सुचवल्या. एजन्सीने डीपीअारमध्ये दुरुस्त्या करून जून राेजी प्राधिकरणाला सुधारित डीपीअार दिला. प्राधिकरणाच्या धुळे कार्यालयाने जून राेजी हा डीपीअार नागपूर विभागीय कार्यालयाला सादर केला. 
 
अशी अाहे खर्चाची तरतुद. 
- जमीन सपाटीकरण, समांतर रस्ते, चौपदरीकरण, काँक्रिटीकरण, पेवर ब्लाॅक, रस्ते सुशाेभिकरणासह रस्त्यासाठी २२६ काेटी लाख ११ हजार २५२ रुपये. 
 
- मुख्य पुलासाठी १६.५४ काेटी, अारसीसी रेटिंग वाॅल २७.८७ काेटी, रेल्वे अाेव्हर ब्रीज ५.९५ काेटी, फ्लायअाेव्हर ५.९३ काेटी,छाेटे पूल ५.६८ काेटी, अाेव्हरपास ६.३८ काेटी,भुयारी पादचारी मार्ग ६.५७ काेटी,अार ई-वाॅल २०.६३ काेटी, अर्बन फॅसिलिटी १२.१५ काेटी,अर्बन लॅन्ड स्केचिंग ५.५० काेटी मेन्टेनन्स ८.९४ काेटी याप्रमुख बाबींसह ४४४ काेटी लाख हजार २१२ रुपयांचा प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार केला. 
 
या बाबींनी कामाला गती 
- महामार्गावर अपघात हाेऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने समांतर रस्त्यासाठी जनअांदाेलन उभे राहिले. त्यामुळे राजकीय दबाव वाढला. 
 
- माध्यमांकडून हाेणारा पाठपुरावा, स्वाक्षरी माेहीम, जळगाव फर्स्ट संस्थेची पदयात्रा अाणि अांदाेलन, डाॅ.राधेश्याम चाैधरी यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांना दरराेज ट्विट, कृती समितीचे अांदाेलन. 
 
- जिल्हाधिकारी जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींकडून हाेणारा पाठपुरावा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला दिलेले प्राधान्य. 
 
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ मे २०१६ राेजी जाहीर कार्यक्रमात या प्रकल्पाची घाेषणा केली हाेती. त्यामुळे त्याच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली हाेती. 
 
- मिनिस्ट्री अाॅफ राेड ट्रान्सपाेर्ट अॅण्ड हायवेने २३ एप्रिल २०१५ राेजी घेतलेल्या निर्णयानुसार काेणत्याही शहराच्या बाहेरून बायपास काढल्यानंतर त्या शहरातील सध्याचा महामार्ग एकवेळ चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची राहील. 
 
शहरातून जाणारा सध्याच्या महामार्गाचे विद्यापीठ प्रवेशद्वार ते तरसाेद फाट्यापर्यंत काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण केले जाईल. किरकोळ अपवाद वगळता या सर्व १५ किलाेमीटर रस्त्यावर दाेन्ही बाजूने प्रत्येकी ३० मीटर जागा उपलब्ध असल्याने भूसंपादनाची गरज राहणार नाही. तसेच गिरणा नदीवर पूल, शिव काॅलनी येथे रेल्वे उड्डाण पूल, बांभाेरी, खाेटेनगर, गुजराल पेट्रोलपंप, शिव काॅलनी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, बहिणाबाई उद्यानाचा काेपरा, अाकाशवाणी चाैक, इच्छादेवी चाैक, खेडी या टप्प्यात १० ठिकाणी भुयारी मार्ग, अजिंठा चाैफुल्ली ते कालिंकामाता मंदिरापर्यंत उड्डाणपूल, दाेन्ही बाजूने समांतर रस्ते, ग्रिनरी, पादचारी मार्ग तयार करण्यात येईल. तसेच भुयारी मार्गावर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर २०० मीटरपर्यंत काँक्रिटीकरण केले जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...