आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामेश्वर कॉलनीत एकाची आत्महत्या, कारण अस्‍पष्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामेश्वर कॉलनी परिसरातील महाजन नगरातील ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
भागवत पंढरी वखरे असे मृत प्रौढाचे नाव आहे. वखरे हे महाजननगर येथे पत्नी इंदूबाई, मुलगा सचिन मुलगी मयुरी यांच्या सोबत राहत होते. ते सेंट्रिग काम सलूनमध्ये काम करीत होते. शुक्रवारी पाडवा शनिवारच्या भाऊबीजेच्या निमित्ताने इंदूबाई ह्या मुलगी मयुरीसह माहेरी (तुकारामवाडी, जळगाव) गेल्या होत्या. तर शनिवारी सकाळी १० वाजता मुलगा सचिन देखील तुकारामवाडी येथे आला होता. त्यानंतर भागवत यांनी घरातील लाकडी बल्लीला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. शेजारी राहणारा एक लहान मुलगा केश कर्तनासाठी वखरे यांच्या घरी गेला होता. त्याने दोन ते तीन वेळा दरवाजा ठोठावल्यानंतरदेखील आतून प्रतिसाद आला नाही. त्या वेळी या मुलाने घरी जाऊन आईला माहिती दिली. त्याच्या आईने पार्टिशनच्या फटीतून आत डोकावल्यानंतर भागवत यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
घरी, जिल्हा रुग्णालयात गर्दी
वखरेंच्याआत्महत्येनंतर मेहरूण भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भागवत वखरे यांच्या शेजारीच त्यांचे मोठे भाऊ देविदास वखरे आई-वडील देखील राहत होते. तसेच त्यांचे बहुसंख्य नातेवाईक मेहरूणमध्ये राहतात. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. अत्यंत साधा स्वभाव असलेले वखरे हे यांनी आत्महत्या का केली, याचे उत्तर मात्र, मिळू शकले नाही. वखरे यांचे वडील, चुलत भाऊ समाजाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.

१० दिवसांत दुसरी आत्महत्या
महाजननगर येथे ११ ऑक्टोबर रोजी जगदीश प्रल्हाद नाईक या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्याने पाच वर्षांच्या मुलास कोठेतरी सोडून दिले होते. हा मुलगा १० दिवस उलटून गेल्यानंतरही सापडलेला नाही. तर शनिवारी भागवत वखरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी जगदीशच्या आत्महत्येस १० दिवस पूर्ण झाले. मेहरूण भागात दहाव्या दिवशी दुसरी आत्महत्या झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...