आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या आंदोलनाने ४५०० विद्यार्थी वाऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करताना पालिकेचे शिक्षक निवृत्त शिक्षक. )
जळगाव - महापालिकाशाळांच्या शिक्षकांना १४ महिन्यांचा ५० टक्के पगार मिळालेला नाही. त्यामुळे बुधवारपासून मनपासमोर शिक्षकांनी बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षकांच्या या आंदोलनामुळे मनपा शाळेतील साडेचार हजार विद्यार्थी मात्र वाऱ्यावर सोडले.
महापालिका शाळांच्या शिक्षकांना राज्य शासन महापालिका प्रत्येकी ५० टक्के मिळून दर महिन्याला पगार मिळतो. गेल्या मे २०१४ ते जून २०१५ अखेर अशा १४ महिन्यांत त्यांना केवळ राज्य शासनाकडून मिळणारा ५० टक्के पगार मिळाला आहे. त्यात पालिकेने ५० टक्के हिस्सा दिलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना निम्माच पगार मिळतो आहे. परिणामी, त्यांचे हाल हाेत आहेत. हा पगार मिळवण्यासाठी शिक्षकांनी बुधवारपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनात २१४ शिक्षक ५०० सेवानिवृत्त शिक्षक सहभागी झाले असून बुधवारी दिवसभर त्यांनी मनपासमोर ठिय्या मांडला होता; तसेच घोषणाही दिल्या.
या वेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष शेख युनूस शेख सत्तार, व्ही.झेड.पाटील, गंगाराम फेगडे, समाधान सोनवणे, तुषार चौधरी, मनीषा सूर्यवंशी, किशोर रोटे, संदीप बांगर, इमरान खाटीक, साबीर इमदाद, सचिन बोरसे, हरिश्चंद्र सोनवणे, पूनम सरोदे, असतुल्ला रेहमतुल्ला, राजेंद्र राजपूत, ईश्वर पाटील, एकनाथ पाटील, शांताराम सोळंके आदी उपस्थित होते. हे आंदोलन पगार मिळेपर्यंत सुरूच ठेवले जाणार आहे. या आंदोलनाला काँ. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
पालिकेकडे शिक्षकांच्या पगारापोटी पाच कोटी, सेवानिवृत्तांचे पाच कोटी ६० लाख, अंशराशीकरण पाच लाख आणि इतर फरक दोन कोटी, असे रुपये थकले आहेत. पूर्ण पगार झाल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नाही. ८१ लाख रुपये दिल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. गंगारामफेगडे, अध्यक्ष, महापालिका प्राथमिक शिक्षक संघ
८१ लाखांचा धनादेश
दरम्यान,शिक्षकांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा एका महिन्याचा निम्मा पगार म्हणजेच ८१ लाख रुपयांचा धनादेश पालिकेकडून प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आला, असे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी सांगितले.
शाळांमध्ये आलबेल
शहरातमहापालिकेच्या ३४ शाळा आहेत. यात सुमारे चार हजार ५०० विद्यार्थी आहेत. बुधवारी शाळेच्या वेळेवर विद्यार्थी शाळेत आले. मात्र, शिक्षकच नसल्यामुळे त्यांच्या दैनंदिन तासिका होऊ शकल्या नाहीत. अशात अनेक विद्यार्थ्यांनी घरी जाणे पसंत केले तर अनेकांनी शाळेच्या आवारातच वेळ घालवला. त्यामुळे शाळेत आलबेल वातावरण निर्माण झाले होते.
महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करताना पालिकेचे शिक्षक निवृत्त शिक्षक.