आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४७ लाखांचे राॅकेल काळ्या बाजारात विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरणगाव - जनता कंझ्युमर्स सोसायटी आणि आदर्श स्वस्त धान्य दुकानाच्या नावावर उचललेले ४७ लाख ७९ हजार रुपयांचे निळे रॉकेल काळ्या बाजारात विकले. तीन वर्षांपूर्वीच्या या प्रकारासंदर्भात कागदपत्रांची मागणी पुरवठा विभागाने केली. ती संस्थेकडून दिली नाही. यामुळे पुरवठा विभागाने चाैकशी करून बुधवारी वरणगाव पोलिसांत राजेश शंकरलाल उपाध्याय आणि मृत्युंजय शंकरलाल उपाध्याय (दोन्ही रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
वरणगाव अायुध निर्माणीतील जनता कंझ्युमर्स सोसायटी आदर्श स्वस्त धान्य दुकानाकडे रॉकेलचे चार परवाने होते. आरोपी राजेश शंकरलाल उपाध्याय आणि मृत्युंजय शंकरलाल उपाध्याय हे दोघे भाऊ सोसायटीचे चेअरमन आणि अध्यक्ष हाेते.या दोघांनी सन २०१२ ते २०१३ दरम्यान शासनाकडून ९६ हजार १२० लिटर निळे रॉकेल उचलले. मात्र, या रॉकेलचे वरणगाव फॅक्टरी दर्यापूर शिवारातील केसरी कॉर्डधारकांना वाटप करता त्याची काळ्या बाजारात विक्री केली. तालुका पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली. या चाैकशीत उपाध्याय बंधूंनी ४७ लाख ७९ हजार ४८२ रुपयांच्या रॉकेलची काळ्या बाजारात विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून राजेश उपाध्याय आणि मृत्युंजय उपाध्याय यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तब्बल तीन वर्षांपूर्वीच्या याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पुरवठा विभागातील काळ्या बाजाराचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. केवळ रॉकेलच नव्हे, तर गोरगरिबांच्या धान्यालादेखील काळ्या बाजारात पाय फुटत असल्याची अनेकांची ओरड आहे. त्याविषयी पुरवठा विभागाने गांभीर्य दाखवणे अपेक्षित आहे.

आरोपी वाढणे शक्य
याप्रकरणात महसूल विभागातील तत्कालीन पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. सखोल चौकशी करून आवश्यकता वाटल्यास आरोपींची संख्यादेखील वाढू शकते. गुन्हा दाखल असलेल्यांना लवकरच ताब्यात घेऊ. -डी.व्ही.गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक, वरणगाव
बातम्या आणखी आहेत...