आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

193 घोड्यांच्या विक्रीतून 47 लाखांची उलाढाल; सारंगखेडा यात्रेत 1 घोडा अडीच लाखांत विकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा- नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेचे प्रमुख अाकर्षण असलेल्या घोडे बाजारात आतापर्यंत १९३ घोड्यांच्या विक्रीतून ४७ लाख ११ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे. बरेली येथील अश्व व्यापारी अब्दुल रशीद अब्दुल समद यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील कडेगाव येथील दिलीप नामदेव घाडगे यांनी दाेन लाख ४० हजारांचा एक घोडा विकत घेतला.


रविवारपासून यात्रेला प्रारंभ झाला. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत अनेक लहानमोठे व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यात अश्व विक्रेत्यांसह बैल व शेतीपयाेगी अवजारे, संसारोपयोगी साहित्य, मसाले विक्रेत्यांचा समावेश आहे. ‘चेतक महोत्सव’ ही यात्रा जगाच्या नकाशावर गेली आहे. या महोत्सवात अश्वांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये विजेत्या अश्वमालकांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात येईल.  खान्देशातील ही सर्वात मोठी यात्रा असून,  राज्याच्या पर्यटन विभागाने यात्रेला यंदा नवा लूक दिला आहे. ‘पुष्कर’ व ‘रण’ उत्सवाच्या धर्तीवर यात्रेत ‘चेतक महोत्सव’ यशस्वी करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न होत आहेत. घोडे बाजारात देशातील विविध राज्यातून अश्व विक्रेते दाखल झाले आहे. खान्देशातील पर्यटनाला चालना मिळाली असल्याची माहिती चेतक महोत्सव 
समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल  यांनी दिली.

 

लेझर शो, हॉर्स रायडिंग   
यात्रेसाठी पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून अश्व व अश्व मालकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तापी नदीवरील बॅरेजजवळ लेझर शो, बोटिंग, वॉटर स्पोर्टस, हॉर्स रायडिंग आदींचा आनंद पर्यटकांना नि:शुल्क  लुटता येणार आहे. भविष्यात  पर्यटन विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अश्व रुग्णालय व संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

 

अश्व छायाचित्रांचे प्रदर्शन   
राजस्थान व कच्छच्या धर्तीवर त्यांना राहण्यासाठी ७० तंबू उभारण्यात आले आहेत. अश्व स्पर्धांच्या ठिकाणी वातानुकूलित प्रेक्षक गॅलरी उभारण्यात अाली आहे. चेतक फेस्टिव्हलसाठी सारंगखेडा ग्रामपंचायतीला सुमारे ९० लाखांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून दत्त मंदिराचे सुशोभिकरण व भक्त निवास बांधण्याचे नियोजन आहे. रशियन छायाचित्रकार कात्या डूझ, भारतीय मनू शर्मा यांचे अश्व छायाचित्रांचे  प्रदर्शन भरवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...