आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना सहा महिन्यांतील ४९५ गुन्ह्यांचा तपास लागेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातचाेऱ्या, घरफाेड्या, दराेडे, साेनसाखळी चाेरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत अाहे. त्यामानाने गुन्हे उघडकीस अाणण्याचे प्रमाण हे कमी अाहे. त्यामुळे चाेरटे मुजाेर झाले अाहेत. सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५३५ वेगवेगळ्या प्रकारांचे गुन्हे घडले अाहेत. त्यातील ४९५ गुन्ह्यांचा तपासच पाेलिसांना लागलेला नाही. पाेलिस दलाचे गुन्हे उघडकीस अाणण्याचे प्रमाण असेच संथगतीने राहिले तर भविष्यात गुन्हेगारी ही माेठ्याप्रमाणात बाेकाळलेली दिसेल.
जानेवारी २०१५ ते जून २०१५ दरम्यान जिल्हाभरात खून, दराेडा, घरफाेड्या, जबरी चाेऱ्या यासारखे २२ प्रकारचे दोन हजार ५३५ गुन्हे घडले अाहेत. यापैकी पाेलिसांना दोन हजार ४० गुन्ह्यांचा शाेध लावण्यात यश अाले अाहे. यात यशाचे प्रमाण जास्त असले तरी अजूनही ४९५ गुन्ह्यांचा म्हणजेच २० टक्के गुन्ह्यांचा शाेध लागलेलाच नाही. यात सर्वाधिक वाटा घरफाेड्यांचा अाहे. सहा महिन्यांतील १११ घरफाेड्यांपैकी केवळ २८ घरफाेड्या उघड झाल्या अाहेत. त्याचे प्रमाण केवळ २५ टक्के अाहे; तर चाेरीच्या गुन्ह्यांतही पाेलिस दल िपछाडीवरच अाहे. सहा महिन्यांत चाेरीच्या ४७४ गुन्ह्यांपैकी केवळ १७५ गुन्हे उघडकीस अाले अाहेत.

एसपींच्या अादेशाला केराची टाेपली
पाेलिसकर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेऊन दाेन महिने उलटले. यातील बरेच कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झालेत. परंतु, काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणीच गेलेले नाहीत. त्यामुळे पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी २१ जुलैला कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी त्वरित हजर हाेण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, या अादेशाला कर्मचाऱ्यांनी केराची टाेपली दाखवली अाहे. शनिपेठ पाेलिस ठाण्यातून एकूण १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात अाल्या अाहेत. मात्र, त्यांना फक्त आठ नवीन कर्मचारी देण्यात अाले आहेत. त्यापैकी एक कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात अाला. त्याचा माेठा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत अाहे.
शहरात दरराेज घरफाेडी, चाेरी, लूट, साेनसाखळी चाेरीच्या घटना घडत अाहेत. त्यामुळे जळगावकर भयभित झाले अाहेत. साेनसाखळीच्या घटनांमुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले अाहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण हाेत चालली अाहे. त्यासाठी पाेिलस प्रशासनाने अापल्या कामगिरीत अधिक सुधारणा करण्याची गरज अाहे. दाेन दिवसांपूर्वी पाेलिस प्रशासनाने काही घरफाेडी साेनसाखळी चाेरांना अटक केली, ही चांगली गाेष्ट अाहे. परंतु, त्यांनी कारवाईचा वेग वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त केली जात अाहे.

प्रशिक्षणार्थी अाल्यानंतर केल्या जाणार नियुक्त्या
जळगावउपविभागातील पाेलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी अाहे. यावर्षी केलेल्या बदल्यांमध्ये पाेलिस ठाण्यांना वाढीव कर्मचारी देण्यात अाले अाहेत. तसेच २९४ नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू अाहे. ते अाल्यानंतर नियुक्त्या देण्यात येतील. डाॅ.जालिंदरसुपेकर, जिल्हा पाेलिस अधीक्षक