आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांना स्वाइन फ्लूची धास्ती; ‘टॅमी फ्लू’ची विक्री वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार जणांना त्याची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात यातील दोन जणांचा बळी गेला तर उर्वरित एका चिमुकलीवर उपचार केल्यानंतर प्रकृती ठिक झाली आहे.
शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील प्रौढावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्या शहरातील मेडिकल दुकानांवर टॅमी फ्लूच्या गोळ्यांची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टॅमी फ्लूचे सेवन करणे घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
डॉक्टरांचा सल्ला घ्या

केवळ स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतरच टॅमी फ्लूच्या गोळ्या घेण्याचा सल्ला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिला आहे. केवळ सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर लगेच टॅमी फ्लू घेणे आरोग्याला घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

केव्हा द्याव्या टॅमी फ्लू

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णावर तीन टप्प्यात इलाज केले जातात. यात पहिल्या टप्प्यात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारची लक्षणे रुग्णात दिसल्यानंतर त्याला अॅन्टिबायोटीक औषधी दिली जातात. दुसऱ्या टप्प्यात रुग्णाच्या शरीराचे तापमान कायम ३८ अंशावर असेल तर त्याची थुंकी तपासासाठी पाठवून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात येते. तर तिसऱ्या टप्प्यात श्वसनास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या होणे, निमोनिया होणे, असे लक्षणे दिसल्यास रुग्णाची थुंकी तत्काळ तपासणीसाठी पाठवून त्याच्यावर टॅमी फ्लू गोळ्या दिल्या जातात.

गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

^सध्या स्वाइन फ्लूची साथ असल्याने सर्दी, खोकला आला तरी काही जण टॅमी फ्लूची मागणी करतात. मात्र, स्वाइन फ्लूची लागण नसताना टॅमी फ्लू घेऊ नये. त्यामुळे तिचा विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात अनेक दुकानांवर टॅमी फ्लू उपलब्ध आहेत. डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

महिनाभरात दोन बळी

जिल्ह्यात चार जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील श्रीकांत मदनराव विधाते (वय ५४, रा.चैत्रबन कॉलनी) यांचा पुण्यात उपचारादरम्यान २३ जानेवारीला मृत्यू झाला. तर भुसावळ येथील प्रतिभा विलास निकम (वय ३६) यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान १४ फेब्रुवारीला मृत्यू झाला. आदर्श नगरातील वर्षांच्या चिमुकलीलाही लागण झाली होती. डॉ. राजेश पाटील यांच्या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिची प्रकृती चांगली झाली. तर शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीला मुंबईत उपचारासाठी पाठवले.