आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायफ्रुटच्या बाॅक्सची यंदा 5 काेटींवर उलाढाल, 10 टक्के दरवाढ होऊनही मागणी कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवाळी सणानिमित्त अाेली मिठाई भेट देण्याएेवजी ड्राटफ्रुटचे बाॅक्सेस देण्याचे चलन काॅर्पाेरेट जगताप्रमाणे सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठानातर्फे अवलंबले जात अाहे. त्यामुळे ड्रायफ्रुटच्या बाॅक्स विक्रीत माेठी वाढ झाली अाहे. यंदा या व्यवसायात जवळपास ते काेटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज अाहे. 
 
दिवाळीच्या उत्सवानिमित्त कॉर्पाेरेट जगतात खास मागणी असणाऱ्या ड्रायफ्रुट्स बॉक्सची बाजारपेठ शहरात विस्तारली असून यात ते कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्समधील वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळे जीएसटी लागल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, लगेचच तो दूर झाल्यामुळे ड्रायफ्रूटच्या बाजारात गर्दी वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. 
 
ड्रायफ्रूटच्या बॉक्समध्ये काजू, किसमिस, अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू, अंजिर, खारा, पिस्ता आदींचा समावेश असताे. यंदा या प्रत्येक घटकाला वेगवेगळे जीएसटी लागू झाल्याने ते बॉक्समध्ये कसे भरायचे आणि त्यांना कसा दर लावायचा? याबाबत व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जीएसटी कायद्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ एकत्र विकण्याच्या प्रकाराला ‘मिक्स सप्लाय’ असे म्हणतात. विशेषत: अशा प्रकारामध्ये सर्व पदार्थांमध्ये सर्वाधिक किंमत असलेल्या पदार्थांना लागणारा कर संपूर्ण पदार्थांच्या एकत्रित किमतीवर लागतो, अशी माहिती सीए राेहन आचलिया यांनी दिली. 
 
जीएसटीनंतर विक्री वाढली 
ड्रायफ्रूटच्याबॉक्सचे २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या बॉक्सना वैयक्तिक ग्राहकांपेक्षा कॉर्पाेरेट स्तरावर अधिक मागणी असते. यासाठी दोन महिने आधीच बुकिंग झालेले असते. आता ऑर्डरची डिलिव्हरी सुरू आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्सना चांगली मागणी अाहे. तसेच जीएसटीनंतर विक्रीत वाढ झाल्याची माहिती महात्मा फुले मार्केटमधील नूतन ड्रायफ्रुटचे संचालक अजय डेडिया यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...