आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Crores 90 Lakh Fund For 52 Villages MP Raksha Khadse

५२ गावांसाठी पाच कोटी ९० लाख निधी, खासदार रक्षा खडसे यांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - मूलभूत सोयी-सुविधा योजनेतून रावेर लोकसभा मतदार संघातील ५२ गावांसाठी प्रत्येकी पाच लाख प्रमाणे, कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सहकार्याने निधीला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना नुकतीच दिली.
पुढे बोलताना खासदार खडसे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विविध विकासकामांसाठी केवळ खासदार निधी अपुरा पडतो. त्यामुळे महसूलमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांकडे निधीची अडचण मांडली होती. त्यानुसार मूलभूत सुविधा योजनेंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रासाठी दोन कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध होईल. तर खासदार निधीतून दोन कोटी ६० लाखांचा निधी मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण चार कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लोकसभा क्षेत्रातील ५२ गावांसाठी प्रत्येकी पाच लाखांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत, असेही खासदार खडसे यांनी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष निवृत्ती पाटील, योगेश कोलते, रावेर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू महाजन, मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती राजू माळी, शिवाजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कामे मार्गी लागतील
रावेरलोकसभा क्षेत्रातील चोपडा, यावल, भुसावळ आणि जामनेर या तालुक्यांमधील ५२ गावांना मूलभूत सोयीसुविधा योजनेतून निधी मिळणार आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.