आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५० लाखांची मॅगी बाजारपेठेतून परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मॅगीच्या उत्पादनावर देशभरात बंदी घातल्यानंतर कंपनीतर्फे जळगावच्या बाजारपेठेतून साठा परत मागवण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन मुख्य वितरकांकडून सुमारे ५० लाख रुपयांचा साठा परत मागवण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत अन्न औषध प्रशासन विभागातर्फे माल विक्री बंद करून कंपनीकडे परत पाठवून त्याबाबत अहवाल दाेन दिवसांत सादर करण्याची नोटीस दोन्ही वितरकांना बजावण्यात आली आहे.
अन्न औषध प्रशासन विभागातर्फे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. सोनवणे यांनी शनिवारी सकाळी गौरी एंटरप्रायजेस येथे जाऊन विक्री बंद करण्याची नोटीस अन्न औषध कायदा सेक्शन २८ खाली बजावली. त्यासोबत बाजारपेठेतून संपूर्ण माल परत मागवून तो कंपनीकडे परत करून त्याचा अहवाल अन्न औषध विभागाकडे दोन दिवसांत जमा करण्याच्या सूचना दिल्या.
काय आहे सेक्शन २८ मध्ये
एखाद्या अन्न व्यवसाय चालकास असे वाटले किंवा कारणपरत्वे सत्यता खात्री झाली की, त्याने बाजारात ठेवलेले अन्न कदाचित ग्राहकांसाठी असुरक्षित आहे, तर तो अन्न व्यवसायचालक त्वरित सक्षम प्राधिकाऱ्यास याची माहिती देईल आणि त्यांना सहकार्य करेल.
अन्न व्यवसायचालक ग्राहकास असलेल्या धोक्यावर घेतलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही सक्षम प्राधिकरणास माहिती करून देईल आणि जिथे अन्नपदार्थामुळे उद्भवणारा धोका याचे प्रतिबंधन, आळा घालणे किंवा निर्मूलन केले जाईल, अशा सक्षम प्राधिकरणास सहकार्य करण्यापासून कोणीही व्यक्तीस अटकाव किंवा नाउमेद करणार नाही.
जिल्ह्यात मॅगीच्या चार व्हरायटी
मॅगीइन्स्टंट नूडल्सच्या व्हरायटीज आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात मॅगी न्यूडल्स, मसाला मॅगी, मॅजिकल मसाला मॅगी मॅगी हमरू या चार व्हरायटीलाच जास्त मागणी आहे.
दोन्ही वितरक शहरातच
जळगाव शहरात गुजराथी गल्लीत गौरी एंटरप्रायजेस बहिणाबाई उद्यानाजवळील अग्रवाल ट्रेडर्स हे दोन प्रमुख वितरक आहेत. त्यांच्यामार्फत शहरात जिल्ह्यात मॅगीचा माल वितरित करण्यात येताे. त्याशिवाय उपवितरक किरकोळ विक्रेते, अशी मोठी साखळी बाजारात कार्यरत आहे.
दुकानांवर मॅगी आढळल्यास कारवाई
- मॅगीवर बंदी असल्याने कोणत्याही लहान, मोठ्या दुकानावर माल आढळून आल्यास विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
एस. एस. देवरे, अन्नसुरक्षा अधिकारी