आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरकटलेल्या सभेत शिक्षकांच्या ५० टक्के वेतन बंदचा ठराव रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ५०टक्के अनुदान नगरसेवकांमुळेच बंद झाल्याचा राेष व्यक्त करणाऱ्या महापालिका शिक्षकांच्या इच्छेखातर विशेष महासभेत वेतन बंद करण्याचा ठराव रद्द करण्यात अाला. पालकमंत्री एकनाथ खडसेंच्या पाठपुराव्याने अनुदानित खासगी प्राथमिक शाळांप्रमाणे मनपा शाळांनाही १०० टक्के अनुदान देण्यात यावे, असा ठराव मंजूर करण्यात अाला. गत महासभेच्या वेळी शिवीगाळ करणाऱ्या चप्पल दाखवणाऱ्या महिला शिक्षकांना सभागृहात बाेलावून माफी मागण्यास भाग पाडण्यात अाले. त्यामुळे अांदाेलकांवर ‘इस हात से लाे अाैर दुसरे हात से दाे’ अशीच वेळ अाली.
मनपा शिक्षकांनी जुलैपासून सुरू केले अांदाेलन प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या पत्रावर विचार करण्यासाठी साेमवारी महापािलकेत सकाळी विशेष महासभा झाली. अध्यक्षस्थानी उपमहापाैर सुनील महाजन हाेते. शिक्षकांना ५० टक्के अनुदान बंदचा ठराव वैध नसल्याचा मुद्दा नितीन लढ्ढा यांनी मांडला. त्यामुळे त्याची अंमलबजावणीच हाेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत हा ठराव रद्द करणे अथवा जसाचा तसा ठेवणे यामुळे फार काही िबघडत नसल्याचेसमाेर अाले. िशक्षकांच्या विषयावर बाेलावलेल्या सभेत राजकीय हेवेदावे नेहमीप्रमाणे पुढे अालेच. त्यामुळे भाजप खाविअा यांच्यात शाब्दिक युद्धही पेटले. अर्धा तास सभा भरकटल्याने काहींनी काढता पाय घेतला.

खडसेंचा मुद्दा अाणि संताप
लढ्ढायांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अनुदानासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपचे रवींद्र पाटील यांनी नाथाभाऊंना नेहमीच टार्गेट केले जाते. मनपातील ही घाण ३० वर्षांपासून काेणी केली, असा प्रश्न केला. खडसेंकडे मनपा, हुडकाे, जिल्हा बंॅक, िशक्षकांचे पगार यासाठी पाठपुरावा सुरू असताे. एका दिवसात प्रश्न सुटणार नाहीत म्हणून बचाव करण्याचा प्रयत्न केला.

अायुक्तांनाचप्पल मारायची हाेती
भाजपगटनेते डाॅ.अश्विन साेनवणे यांनी नगरसेवकांना चप्पल दाखवणाऱ्या शिक्षकांना सभागृहाची माफी मागण्यासाठी बाेलवा अशी मागणी केली. अमर जैन यांनीही ती चप्पल मला दाखवली नव्हती तर अायुक्तांना मारण्यासाठी दाखवली हाेती, असा खळबळजनक खुलासा केला. कैलास साेनवणेंनी हा प्रकार घडण्याची शक्यता अाहे हे मी अाधीच बाेललाे हाेताे. परंतु अायुक्तांनी त्याचा अर्थ वेगळाच लावला. उल्लू बनवण्याचे काम करतात.

घाणेरडे पाणीही अाले चर्चेत
नगरसेवकगणेश साेनवणेंनी सभागृहाला ज्या टाकीत कबुतर मेले तेच पाणी पाजले जात असल्याचे उघडकीस अाणले. शिक्षिकांच्या शिव्यांपेक्षा हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे पाण्याची टाकी साफ केली जात नसल्याचा अाराेप करण्यात अाला. किशाेर पाटलांनी तर यामुळे लहान मुले, गर्भवती वृद्धांना त्रास हाेत असल्याचा अहवाल असल्याचे सांगितले.

शिक्षक नेत्यांना घेराव अन‌् माफी
सभागृहाचाअवमान खडसेंसाेबत झालेल्या चर्चेचा तपशील जाणून घेण्यासाठी िशक्षक नेते व्ही.झेड. पाटील गंगाराम फेगडे यांना बाेलावण्यात अाले. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांना गराडा घालत बाेलण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे ते माघारी परतले पुन्हा िशक्षिका िशक्षकांना घेऊन सभागृहाची माफी मागितली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी माफी मागणे हा अामचा उद्देश नसून त्यांच्यावर कारवाई करावी, यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

महासभेत सतरा मजलीवरील पाण्याच्या टाकीत कबुतर मृत हाेतात अाणि तेच पाणी प्यायला दिले जात असल्याचे दाखवताना गणेश बुधाे साेनवणे. गत महासभेत नगरसेवकांना अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या शिक्षकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना झालेली चूक लक्षात अाणून देताना भाजप गटनेते डॉ.अश्विन साेनवणे. साेबत वामनराव खडके.

महाजनांवर अाराेप
पगारबंद करण्याचा ठराव महासभा करू शकत नाही. त्यामुळे हा ठराव वैध नसल्याचे प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांनी सांगितले. अांदाेलनाबाबत दाेन पत्र देऊनही काहीही एेकायला तयार नसल्याचे ते म्हणाले. मी देखील येथून बदली करण्याची िवनंती केल्याचे ते म्हणाले. अमर जैन यांनी बदलीच करायची तर कशाला येतात इथे. हा तर पळपुटेपणा असे म्हणत त्यांना फैलावर घेतले
बातम्या आणखी आहेत...