आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे एक्स्प्रेसमध्ये ५० हजारांची चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत पुणे-बिलासपूर एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी ५० हजार ५०० रुपयांचा एेवज लांबवला. मनमाड स्थानकावर गाडी थांबली असताना झालेल्या या चोरीप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, उन्हाळी सुट्यांमध्ये वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चाेरटे सक्रिय झाल्याचे समोर येत आहे.

गाड्यांमध्ये असलेली गर्दी पाहता अनेक प्रवासी जागा मिळेल तेथे बसून प्रवास करतात. नेमकी ही संधी साधून साहित्य चोरी घटना वाढल्या आहेत. अपूर्व अग्रवाल (रा.कोथरुड, पुणे) हे पुणे-बिलासपूर एक्स्प्रेसच्या बी-४ डब्यातील सीट ३६ वरून प्रवास करीत हाेते. मनमाड रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असता अग्रवाल यांच्या झाेपेचा फायदा घेत चाेरट्यांनी त्यांची काळ्या रंगाची बॅग लांबवली. बॅगेत, तीन माेबाइल, एटीएम, पॅनकार्डसह अन्य साहित्य मिळून सुमारे ५० हजार ५०० रुपयांचा एेवज लांबवला. अग्रवाल यांनी भुसावळ लोहमार्ग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भुसावळ येथील पाेलिसांनी हा गुन्हा मनमाड पाेलिसांकडे वर्ग केला. निरीक्षक अानंद महाजन यांनी फिर्यादीकडून माहिती जाणून घेतली.
बातम्या आणखी आहेत...