आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : हाडाखेडजवळ ट्रकसह 53 लाखांचा मद्यसाठा केला जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मालट्रक. - Divya Marathi
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मालट्रक.
धुळे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-अाग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेडजवळ एका ट्रकमधून मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ट्रकसह ५३ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा मध्य प्रदेशात तयार करण्यात आला आहे. महामार्गावर मद्यविक्री बंद झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही सर्वात माेठी कारवाई अाहे. याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
शिरपूर तालुक्याला लागून मध्य प्रदेशची सीमा असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी केली जाते. तालुक्यातील हाडाखेड गावाजवळून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयावरून ट्रकची (क्र.एमपी ०९-एचएफ ७७८७) तपासणी केली. या वेळी ट्रकमध्ये मध्य प्रदेशमध्ये निर्मित विक्रीसाठी नेण्यात येत असलेले बिअरच्या बाटल्यांचे खाेके अाढळून अाले. त्यामुळे हा मुद्देमाल जप्त करण्यात अाला. या कारवाईत विविध प्रकारच्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, ट्रकसह मुद्देमाल ५३ लाख ८४ हजार रुपयांचा आहे. याबाबत ट्रकचालक अन्सार खान इदा खान (रा.धार) अाणि सहचालक शाकीर अन्सार पटेल (रा.उज्जैन) या दाेघांना अटक करण्यात अाली अाहे.
 
ही कारवाई राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक मनाेहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एम.एन. कावळे, शिरपूर विभागचे निरीक्षक डी.एम. चकाेर, हाडाखेड निरीक्षक व्ही.बी. पवार, दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, एल.एम. धनगर, जवान शांतिलाल देवरे, अार.एन. साेनवर, ए.व्ही. भडागे, प्रशांत बाेरसे, अमाेल धनगर, के.एम. गाेसावी, जी.एम. पाटील, जी.व्ही. पाटील, कपिल ठाकूर, वाहनचालक विजय नाहिते यांच्या पथकाने केली. निरीक्षक एम.एन. कावळे तपास करीत अाहेत. दरम्यान, सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार राज्य, राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्रीस प्रतिबंध घालण्यात अाला अाहे. त्यामुळे महामार्गावरील मद्यविक्रीची अनेक दुकाने बंद झाली असून, दुसरीकडे मद्याची चोरटी वाहतूक वाढली अाहे. अनेक खासगी वाहनातूनही मद्याची वाहतूक केली जाते. 
 
बसस्थानकाजवळ मद्यसाठा जप्त 
साक्री तालुक्यातील छडवेल काेर्डे येथील बसस्थानकातून गावातील विक्की रतीलाल चाैधरी (वय २२) याच्या जवळ असलेला २१ हजार ४८० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा त्याने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी स्वत:जवळ बाळगल्याचा संशय अाहे. सर्व मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, पाेलिस नाईक सागर खंडेराव ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पाेलिस ठाण्यात विक्की चाैधरी याच्याविरुद्ध मुंबई प्राेव्ही. कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल झाला अाहे. तपास हेडकाॅन्स्टेबल काेकणी करीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...