आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिगावात विहिरीत पडून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू, परिसरात हळहळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल -तालुक्यातील दहिगाव येथे ५५ वर्षीय इसमाचा विहिरीत बडून मृत्यू झाल्याची घटना शनीवारी उघडीस आली. रमेश रामदास पाटील (रा. दहिगाव) असे मृत इसमाचे नाव अाहे. जयश्री पांडुंरंग चौधरी (रा. दहिगाव) यांच्या गट क्रमांक ८८४ मधील शेतातील विहीरीचे काम सुरू होते. या कामासाठी रमेश पाटील १२ वाजेच्या सुमारास विहिरीत उतरले. त्यांचा काहीवेळ आवाज आल्याने सोबतच्या व्यक्तीने विहीरीत पाहिले असता ते मृतावस्थेत आढळले. या बाबत सावखेडासीमचे पोलिस पाटील पंकज बडगुजर यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पाटील यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...