आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदी असलेली ५६ लाखांची ‘व्हिस्की’ एरंडोलला जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल - महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेल्या ‘पंजाब स्पेशल व्हिस्की’ची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनास जळगाव मुंबई येथील दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पहाटे पकडले. त्यांच्याकडून सुमारे ५६ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात अाली.

महाराष्ट्रात बंदी असलेली ‘पंजाब स्पेशल व्हिस्की’ची वाहतूक ट्रक (पीबी-११-बीआर-४५५३) मधून हाेत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या मुंबई जळगाव येथील भरारी पथकास मिळाली हाेती. त्यानुसार तपासाधिकारी ए.पी.तारू, कर्मचारी पी.जी.अवचर, संजय केंद्रे, चोपड्याचे लीलाधर पाटील, जळगावचे आर.के.लब्दे, आय.बी.बाविस्कर त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. त्यात ‘पंजाब स्पेशल व्हिस्की’च्या ७५० मिलिलिटरच्या १६ हजार ८०० बाटल्या १४०० बाॅक्समध्ये आढळून आल्या. ट्रकचालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...