जळगाव- शहरातील ५२ जागांच्या वापरासाठी महापालिकेने नगरविकास विभागाची परवानगी घेतली नसून, जागांबाबत शर्तभंगही केला आहे. फुले मार्केट असलेल्या जागेवर शासनाची परवानगी घेता मार्केट बांधल्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी साेमवारी आयुक्तांना नोटीस पाठवून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मनपा हद्दीतील मनपाच्या मालकीच्या खुल्या भूखंडाची पाहणी पडताळणी तलाठींमार्फत नुकतीच करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी २१ मे रोजी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे दिला होता. त्यात मनपाने दिलेल्या काही भूखंडांचा योग्य प्रयोजनाशिवाय अन्य प्रयोजनासाठी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेता वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच त्यात पालिकेकडून शर्तभंगदेखील झाल्याचे दिसून आले आहे.
नगर भूमापनचा अभिप्राय घेणार
तलाठींमार्फत केलेल्या पाहणीद्वारे दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात सीटीएस मिळकतीबाबत नगर भूमापन अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्याची सूचना करण्यात आली आहे. महसूल विभागाने शहरातील चार शिवारांतील एकूण १२७ जागांची पाहणी करून ५७ जागांबाबत थेट शेरे मारले आहेत. या जागांच्या वापराबाबत महापालिकेकडे काही कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्यांनाही म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. शर्तभंग प्रयोजनाशिवाय वापर झालेला असल्यास त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या सूचना
महापालिका हद्दीतील विविध अकृषक भूमी अभिन्यासातील ज्या खुल्या जागा अवैधरीत्या अन्य संस्था वा व्यक्तींना देण्यात येऊन त्यांचा वापर योग्य प्रयोजनाशिवाय होत आहे. अशा खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, फुले मार्केटच्या जागेबाबत...