आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 58 Percent Of The Cost Of The Planning Committee,

नियोजन समितीचा खर्च 58 टक्के- डीआरडीएकडे शिल्लक 70 कोटी खर्च होणार वर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध शासकीय विभागांना मिळालेल्या खर्चापैकी 58 टक्के खर्च झाला आहे. उद्दिष्ट कमी झाल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे शिल्लक असलेला 70 कोटी रुपयांचा निधी इतर विभागांना वर्ग करण्यासह जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी बुधवारी सर्व विभागांचा आढावा घेतला.

127 कोटीचा निधी खर्च

जिल्हा नियोजन समितीने 2012-2013 या वर्षासाठी एकूण 317 कोटी 86 लाख रुपयांची तरतूद केली होती. यापैकी 300 कोटी 79 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्राप्त निधीपैकी विविध विभागांनी 127 कोटी 82 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती नियोजन समितीच्या आढावा बैठकीत नियोजन अधिकार्‍यांनी दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीच्या उपलब्धतेअभावी काही योजनांवर खर्च होऊ शकत नसल्याची कारणे काही विभागांच्या अधिकार्‍यांनी दिली. बांधकाम, कृषी, जलसंधारण या विभागाचा निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूूरकर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री घेणार बैठक


जिल्हा नियोजन समितीच्या वर्ष 2014-15 या वर्षासाठी तरतूद करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 जानेवारी रोजी नाशिक येथे बैठक आयोजित केली आहे. जिल्हानिहाय बैठकीत ते या निधीला मंजुरी देतील. यासाठी सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.