आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी पदाच्या परीक्षेला २५,२६५ पैकी ६ हजार ३५० उमेदवारांनी मारली दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तलाठी भरती परीक्षेसाठी १५ लाख रुपयांचा फुटलेला भाव, उमेदवारांच्या नातेवाइकांकडून सेटिंगचा प्रयत्न आणि दलाल कमालीचे सक्रिय झाले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत जिल्ह्यातील ९१ केंद्रांवर तलाठी भरतीसाठी रविवारी परीक्षा झाली. ही परीक्षा अत्यंत पारदर्शक सुरळीतपणे पार पडल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातही तलाठी भरतीची लगबग सुरू होती. तर जळगाव जिल्ह्यातील ५० तलाठी पदांची जम्बो भरती जिल्हा प्रशासनाने रविवारी आयोजित केली होती. ही भरती कॅश करण्यासाठी जोरदार सर्वंकश प्रयत्न सुरू झाले होते. भरती प्रक्रिया जवळ येत असताना उमेदवारांच्या नातेवाइकांसह दलाल कमालीचे सक्रिय झाले होते. या पदासाठी १५ लाखांचा भाव फुटला होता.
तलाठी भरतीचा जणू बाजारच भरला होता; तर बोली लावल्यासारखे भाव ठरवण्यात येत होते. सुरुवातीला आठ ते दहा लाखांवर असलेले भाव तब्बल १५ लाखांवर शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्याचे लोण पसरले होते. त्याचा ‘दिव्य मराठी’ने भंडाफोड केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी खुलासाही करण्यात आला. त्यात तलाठी भरती प्रक्रिया जिल्हा निवड समिती मार्फत प्रभावी, कडक पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. परीक्षार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अामिषाला बळी पडू नये. कोणताही इसम भूलथापा देत असल्यास त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. म्हणजे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करता येईल, असा खुलासा प्रशासनाने केला होता.

या ठिकाणी झाली परीक्षा
जळगाव शहरातील केंद्रावर सर्वाधिक १२ हजार १७८ उमेदवारांनी परीक्षा दिली. भुसावळ शहरामधील केंद्रांवर हजार ७७६, अमळनेर हजार ८३२, चाळीसगाव हजार ६६ तर फैजपूर शहरातील केंद्रांवर ४१३ उमेदवारांनी परीक्षा दिली.

जिल्हा प्रशासनाचे असे होते नियोजन
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, फैजपूर तालुक्यातील ९१ केंद्रांवर परीक्षा झाली. या परीक्षेसाठी २६ हजार २६५ उमेदवार पात्र होते. त्यापैकी १९ हजार १९५ उमेदवारांनी परीक्षा दिली. हजार ३५० उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ७५.८२ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी हजार ९६ समवेक्षक, २७४ पर्यवेक्षक, ९१ उपकेंद्रप्रमुख, १८२ मदतनीस शिपाई नेमण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...