आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत बहिणीच्या नामकरण सोहळ्यानंतर ६वर्षीय बालकाचा जिन्यावरून पडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवी पेठेतील मुरली भवनात राहणाऱ्या मुंदडा परिवाराच्या चिमुकलीचा नामकरणाचा सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या थाटात झाला. मात्र, त्यानंतर परिवारातील अवघ्या सहा वर्षांचा चिमुकला ‘चिराग’चा घराच्या जिन्यावरून पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी ६.३० वाजता घडली. आनंदाच्या सोहळ्यानंतर चिरागच्या मृत्यूमुळे मुंदडा परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मुरली भवनात अशोक मुंदडा यांच्यासह त्यांचे तीन भावांचे कुटुंब एकत्रित राहते. अशोक मुंदडा यांचा पुण्यातील मुलगा विनोद यांना सव्वा महिन्यापूर्वी कन्यारत्न झाले होते. तिचा नामकरण सोहळा मुरली भवनात आयोजित करण्यात आला होता. यासाठी विनोद मुंदडा यांची पत्नी चार दिवसांपूर्वी मुरली भवन येथे पुण्याहून आली होती. गुरुवारी सायंकाळी वाजता मुरली भवनात या नामकरण साेह‌ळ्यासाठी नातेवाईक मोठ्या प्रमाणात आले होते. मोठ्या थाटात चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पडला. याचदरम्यान विनोद यांचा भाऊ भूषण मुंदडा यांचा पाच वर्षांचा मुलगा चिराग मुलांसोबत घराच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर खेळत होता.
नामकरण सोहळ्यानंतर मुंदडा कुटुंबीय पाहुण्यांना निरोप देण्यात व्यस्त होते. या वेळी चिराग खेळता खेळता घराच्या जिन्यावरून खाली कोसळला. यामुळे पाहुणे मंडळींची एकच पळापळ झाली. महिलांनी जोरात आरडाओरड केली. लहान मुलेही प्रचंड घाबरली. त्याच्या डोक्याला मागच्या बाजूने हनुवटीला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नाकातून कानातून रक्तास्त्राव झाला होता.

एकुलता मुलगा
वैशालीभूषण यांना चिराग हा एकुलता मुलगा होता. भूषण हे जळगाव बाजार समितीमध्ये आडत कमिशन एजंट आहेत. चिराग सेंट टेरेसा स्कूलमध्ये नर्सरीमध्ये शिकत होता.

मृत चिराग मुंदडा
चिराग जिन्यावरून पडल्याने त्याची आई वैशाली वडील भूषण यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. त्याच अवस्थेत वैशाली यांनी जखमी चिरागला कुशीत घेऊन नवीपेठेतील डॉ. मिलिंद राणे यांच्या दवाखान्याकडे धाव घेतली. त्यांच्या पाठीमागे पाहुणे नागरिक दवाखान्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून इंडो-अमेरिकन दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्वरित त्याला इंडो अमेरिकन दवाखान्यात हलवले. मात्र, तेथे उपचारादरम्यान सायंकाळी वाजता त्याची प्राणज्योत मालवली. चिरागच्या मृत्यूची माहिती कळताच आई वैशाली बेशुद्ध झाली.
वडील भूषण यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर ते निःस्तब्ध होऊन चिरागच्या मृतदेहाकडे एकटक बघत राहिले. तेथून चिरागच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवला. पुणे येथे असलेले चिरागचे काका विनोद मुंदडा आपल्या मुलीच्या नामकरण सोहळ्याला उपस्थित नव्हते. नातेवाइकांनी चिरागच्या मृत्यूबाबत कळवल्यानंतर त्यांना धक्का बसला. जळगावला येण्यासाठी ते रात्रीच पुण्यावरून निघाले होते.

चिराग नेत्ररूपी उरणार
चिरागच्या मृत्यूनंतर मुंदडा परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला. सर्व कार्यवाही करून मांगीलाला बाफना नेत्रपेढी चिकित्सालयाच्या सहकार्याने नेत्रदानाचे काम वेळेत केले. जळगावात केवळ सहा वर्षांच्या मुलाच्या नेत्रदानाचे हे एकमेव उदाहरण असावे, असे नेत्रपेढीच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तर मुंदडा परिवारासाठी चिराग आता नेत्ररूपी उरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...