आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंब पावसाने रान झालं, आबादानी... पावसाने गाठली ६० टक्के सरासरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी पाऊस जुलै महिन्यात सुरू झाला. तब्बल दीड महिना पावसास उशीर झाला. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसाने समाधान व्यक्त करण्यात अाले. पावसाने पुन्हा दडी मारली. मात्र, गेल्या अाठवड्यापासून शहरासह परिसरात जाेरदार वृष्टी झाली आहे. त्यामुळे मेहरूण तलाव परिसर हिरवाईने नटला अाहे. हा हिरवागार परिसर बघून बालकवींच्या निसर्ग कविता अाेठावर अाल्या वाचून राहत नाहीत.

मेहरूण तलावात यापूर्वीच ६० टक्के जलसाठा हाेता, यात अाणखी वाढ झाली अाहे. जळगाव तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पाऊस झाला. अाॅगस्टमध्ये पावसाने सरासरी ९५ टक्क्यापर्यंत भरून काढली आहे. एरंडाेल, यावल, चाेपडा तालुक्यांतही ७० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला अाहे. जामनेर,बाेदवड, मुक्ताईनगरात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

गेल्या अाठवड्यापासून जिल्ह्यात मुक्कामाला असलेल्या पावसाने अाॅगस्ट महिन्यातील पावसाचा अनुशेष भरून काढला अाहे. अाठवडाभरात तब्बल २० टक्के पाऊस झाला आहे. ४०० मिलिमीटर पावसाची अातापर्यंत नाेंद झाली असून येत्या अाठवड्यात पावसासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान खात्याचा अंदाज अाहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पातळी समाधानकारकरित्या वाढली अाहे.

७० टक्केपाऊस झाला जळगाव तालुक्यात
४०० मिलिमीटरपावसाची अातापर्यंतची नाेंद
छाया : योगेश चौधरी