आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६०० कि.मी. टप्पा; ४० तासांचे सायकलिंग ३४ तासांत गाठले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर (जि. जळगाव) - स्काॅलरशिपची परीक्षा पास झालास तर तुला सायकल घेऊन देईन, असे चौथीत वडिलांनी म्हटले होते. तेव्हापासून सायकलच्या आकर्षणाने भारावलेल्या शुभम संकपाल या तरुणाने आज सायकलिंगमध्येच करिअर करण्यासाठी संघर्ष चालवला आहे. मुलुंड-धुळे-मुलुंड असा ब्रिवेटचा ४० तासांत पूर्ण करायचा ६०० कि.मी.चा टप्पा शुभमने अवघ्या ३४ तासांत पूर्ण केला . घरची परिस्थिती बेताची असली तरी इच्छाशक्तीच्या बळावर आता सुपर रॅन्डोनिअर हा किताब मिळवून जागतिक स्तरावर ब्रिवेटमध्ये सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

धुळ्याच्या एसएसव्हीएसच्या डाॅ. पी.आर. घोगरे महाविद्यालयात एम.एस्सी (वनस्पतिशास्त्र) द्वितीय वर्षाला शुभम शिकत असून, त्याचे वडील डाॅ. प्रदीप हे जळगावच्या बोदवड तालुक्यातील जामठी येथे होमिओपॅथीचे क्लिनिक चालवतात. ‘धुळे सायकलिस्ट क्लब’चे प्रमुख प्रा.पराग पाटील यांच्याशी संपर्क करून ब्रिवेटमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अनेक ब्रिवेटमध्ये सहभाग घेतला.
अलीकडेच झालेल्या मुलूंड-धुळे-मुलूंड या ब्रिवेटमध्ये शुभमने ६०० कि.मी. अंतर ३४ तासांत पूर्ण केले. यात राज्यभरातील विविध रायडर्स सहभागी झाले होते. आता ८० तासांत १२०० कि.मी.चा टप्पा गाठून सुपर रॅन्डोनियर होण्याचे शुभमचे स्वप्न आहे. शुभमला या यशासाठी डॉ. सुनील नाईक, डॉ.आशीष अग्रवाल, डॉ.समिर शिंदे, दिलीप अहिरे, रमाकांत व श्रीकांत गिंदोडीया, छत्रपाल भदाने आदींचे मार्गदर्शन मिळाले. मुलांचा कल लक्षात घेऊन पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर यश नक्कीच मिळते, असे शुभमचे वडील डाॅ. प्रदीप यांनी म्हटले आहे.
पॅरिसहून मिळते मेडल
सायकल रायडर्ससाठी फ्रान्सच्या पॅरिसमधील “डॅक्स’ ही जागतिक दर्जाची संस्था आहे. कोणत्याही ब्रिवेटमध्ये सहभागी होण्याआधी डॅक्सकडे नोंदणी करावी लागते. पुणे येथील दिव्या तोटा या डॅक्सच्या भारतातील समन्वयक आहेत. ब्रिवेटमध्ये यशस्वी रायडर्सना पॅरिस येथून मेडल्स दिली जातात.
जागतिक ब्रिवेटचे लक्ष्य
सुपर रॅन्डोनियरसाठी वर्षात २००, ३००, ४०० , ६०० कि.मी.च्या ब्रिवेटआवश्यक. शुभमची ४०० कि.मी.ची ब्रिवेट राहिली असून, या महिन्यात नाशकात होणार आहे. पुढे ८ तासांत १२०० कि.मी.च्या टप्प्यानंतर सुपर रॅन्डोनियर होईल. डेक्कन क्वीप हँगर व भुतान रेस या ब्रिवेट पूर्ण करून तो अमेरिका, पॅरिस, फ्रान्स येथे ब्रिवेटमध्ये सहभागी होईल.
मोटारसायकल शिकलोच नाही
लहानपणी सायकलचे आकर्षण निर्माण झाले. त्याच क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न आहे. यामुळे मोटारसायकलही कधी शिकावी वाटली नाही. सर्व कामे सायकलवरूनच करतो. सायकलींगमुळे उत्तम शरीरयष्टी, सुदृढ आरोग्य राखता येते.
- शुभम शंकपाळ, रायडर
बातम्या आणखी आहेत...