आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाची कृपा; वाघूरमध्ये ६१ टक्के साठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यानंतर वाघूरवर दरवर्षीप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाची कृपा होऊन पाणीसाठा ६१.४५ टक्क्यांवर पाेहोचला अाहे.
यंदा सुरुवातीच्या तीन महिन्यांत सपशेल पाठ फिरवणारा मान्सून अजिंठ्याच्या डाेंगररांगा अाणि वाघूरच्या विस्तार क्षेत्रात दमदार बरसल्यामुळे वाघूरचा जलसाठा वाढण्यात काहीअंशी मदत झाली. जिल्ह्यात अाजअखेर माेठ्या प्रमुख तीन प्रकल्पांमधील पाण्याचा साठा ७१ टक्के, १३ मध्यम प्रकल्पांमधील साठा ५६.३२ टक्के तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पांमध्ये मात्र केवळ ३१.५ टक्के साठा झाला अाहे.

जळगाव शहराच्या पिण्याची पाण्याची मदार असलेल्या वाघूर प्रकल्पातील जलसाठ्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते. गेल्या दाेन महिन्यांत जिल्ह्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला, परंतु वाघूर क्षेत्रात पाऊस झाल्याने वाघूरची जलपातळी खालावली होती. मात्र, परतीच्या पावसाने अजिंठा डाेंगररांगेत जाेरदार हजेरी लावल्याने वाघूरचा जलसाठा वाढत गेला. जुलै महिन्यात ५० टक्क्यांपर्यंत असलेला जलसाठा अाता ६१ टक्क्यांवर आला अाहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता सध्यातरी मिटली आहे.

गिरणा प्रकल्पात यावर्षी प्रथम ६८.६१ तर हतनूरमध्ये ८७.५३ टक्के इतका पाणीसाठा अाहे. वाघूर पाठाेपाठ अजिंठा डाेंगररांगेत असलेल्या ताेंडापूर प्रकल्पात ८७.६७ टक्के जलसाठा निर्माण झाला अाहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यावर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
लघुप्रकल्पांमधील जलसाठा कमी असल्याने टंचाईची भीती
माेठ्या अाणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अनुक्रमे ७० अाणि ५० टक्क्यांपुढे असला तरी जिल्ह्यातील तब्बल ९६ प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा केवळ ३१.५ टक्के एवढाच अाहे. सिंचन अाणि पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई काळात लघु प्रकल्पातील जलसाठा महत्त्वाचा असताे. दरम्यान, यावर्षी केवळ ३१ टक्केच साठा असल्याने टंचाई काळात अडचणी निर्माण हाेण्याची भीती अाहे. अग्नावती, हिवरा अाणि भाेकरबारी या मध्यम प्रकल्पांत अद्यापही ठणठणाट असल्याची स्थिती अाहे.

गूळ प्रकल्प भरण्यासाठी अजून जाेरदार पावसाची प्रतीक्षा
चोपडा शहर तालुक्यात सलग तीन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त हाेत अाहे. केळी, कापूस पिकांना हा पाऊस लाभदायक ठरत आहे. मंगळवारी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रात्री हवेत गारवा निर्माण झाला होता. सरत्या पावसाळ्यात नदी-नाल्यात पूर गेल्यास पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या वर्षी सातपुढ्याच्या पायथ्याशी पावसाचं अत्यल्प प्रमाण असल्याने गूळ प्रकल्प अजूनही शंभर टक्के भरू शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...