आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगरात ८२ गावांसाठी अवघे ६१ पोलिस कर्मचारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - तालुक्यातील भौगोलिक स्थिती लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केवळ ५७ पोलिस आणि चार अधिकारी मिळून ६१ कर्मचा-यांवर ८२ गावांची जबाबदारी आहे. यापैकी १५ कर्मचा-यांची बदली झाली असून त्यांना सोडल्यास उर्वरित ४२ कर्मचा-यांची अडचणीच्यावेळी चांगलीच दमछाक होऊ शकते.
तब्बल ४० वर्षांपासून मुक्ताईनगरातील पोलिसांची ६१ ही पदसंख्या कायम आहे. यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडल्यास इतर ठिकाणाहून पोलिक कुमक मागवावी लागते. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या मुक्ताईनगरात पोलिस ठाण्याच्या आधुनिकीकरणासह गरजेनुसार कर्मचा-यांची िनयुक्ती गरजेची आहे. तूर्त तालुक्यात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासह कुऱ्हा आणि अंतुर्ली येथे दूरक्षेत्र आहे. कुऱ्हा दूरक्षेत्रांतर्गत ३३ गावांच्या सांभाळासाठी केवळ चार पोलिस, तर अंतुर्लीतील १५ गावांसाठी अवघे तीन पोलिस आहेत. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव २००८पासून पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नाही.

१८ पैकी १३ हजर : येथील५३ पैकी मे-जूनमध्ये तीन एएसआय, चार हेड कॉन्स्टेबल, चार पोलिस नाईक, १२ कॉन्स्टेबल, तीन महिला पोलिस कर्मचारी अशा एकूण २६ कर्मचा-यांची बदली झाली. नव्याने मुक्ताईनगरात १८ कर्मचारी बदलून आले असून त्यापैकी केवळ १३ हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निरीक्षक चंदेल यांची हातोटी : मुक्ताईनगरचेपोलिस निरीक्षक म्हणून राजेशसिंह चंदेल यांनी नुकताच पदभार घेतला आहे. यापूर्वीदेखील सेवा दिल्याने त्यांना तालुक्याची खडान््खडा माहिती आहे. यामुळे कर्मचारी कमी असले तरी कोणतीही स्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे.

बनावट नागमणी अन् मांडूळ : बनावटनागमणी, मांडूळ खरेदी-विक्री, रस्ता लूट, वनसंपदेची तस्करी, मध्य प्रदेशची सीमा लागून असल्याने गुटख्याची तस्करी आदी प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात अधूनमधून उघडकीस येतात. अशावेळी आवश्यक तेवढे पोलिस बळ उपलब्ध असल्यास काम करणे सोपे होते.
बातम्या आणखी आहेत...