आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६१ हजारांवर मतदारांची आधार कार्ड लिंकिंग पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरविधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत १९ जुलैपर्यंत ६१ हजार ५८१ मतदारांनी त्यांचे मतदान कार्ड आधार लिंकिंग केले असून येत्या १२ दिवसांत प्रशासनाला फार मोठी मजल मारायची आहे.

मतदारयादी शुद्धीकरण प्रमाणीकरण कार्यक्रमास मार्चपासून प्रारंभ झालेला असून हा कार्यक्रम ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १२ एप्रिल, १७ मे, २१ जून आणि १२ जुलै रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रारंभीच्या काळात मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम राबवण्याबाबत अनुत्सुकता दाखवली होती. त्यामुळे मार्च महिन्यात या कार्यक्रमांतर्गत कार्यवाही झालीच नसल्यामुळे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी ६५ बीएलओंना नोटीस दिली होती. परंतु, त्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमास गती मिळाली. परंतु, बीएलओंनी काम करण्यास प्रारंभ केल्यानंतर मात्र मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
मतदारयादी शुद्धीकरण प्रमाणीकरण कार्यक्रमाचे टप्पे

- कालावधी : मार्च ते ३१ जुलै
- जळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार : लाख ३९ हजार ४००
- आधार लिंकिंग झालेले मतदार : ६१,५८१
- मतदान केंद्र : १७८
- मतदान केंद्रस्तरीय अधिकारी : ३८२

शुद्धीकरण कशाचे?
याकार्यक्रमानुसार मतदारयाद्यांमध्ये असलेली मतदारांची दुबार नावे, स्थलांतरित नावे, नावे वगळण्यात आलेल्यांची नोंदणी, नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी क्रमांकाचा अर्ज नावात दुरुस्ती करण्यासाठी क्रमांकाचा अर्ज मतदारांना भरून द्यावा लागत आहे.
१२दिवसांत आधार लिंकिंगचे आव्हान
जळगावशहर विधानसभा मतदारसंघाची तीन लाख ३९ हजार ४०० मतदार संख्या आहे. मतदारयादी शुद्धीकरण प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ६१ हजार ५८१ मतदारांच्या मतदान कार्डचे आधार लिंकिंग करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची मुदत ३१ जुलैपर्यंत असून येत्या १२ दिवसांमध्ये प्रशासनासमोर अडीच लाखांवर मतदारांचे आधार लिंकिंग करण्याचे मोठे आव्हान आहे.

मतदारयादी शुद्धीकरण प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांना ३१ जुलैपर्यंत मतदारयादीतील दुबार नावे वगळणे, नावात बदल करणे, दुरुस्ती करणे, नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे मतदारांनी मतदान कार्डचे आधार लिंकिंग करून घ्यावे. या कार्यक्रमाची मुदत वाढण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वरसपकाळे, नायब तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...