आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये ६२ टक्के पाऊस कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जून महिना उलटूनही पेरणीयोग्य दमदार पाऊस झाल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. गेल्या वर्षी २८ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ९४ टक्के पाऊस हाेता. ताे यावर्षी अाज अखेर केवळ ३८ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सूत्रानुसार जिल्ह्यात २८ जूनपर्यंत १२१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना, यावर्षी मात्र केवळ ४६.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जून महिन्यात जिल्ह्यात भुसावळ अाणि चाळीसगाव वगळता इतर तालुक्यांत काेठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्यात १२१.३ मि.मी.पाऊस हाेताे. यावर्षी मात्र केवळ ४६.४ मि.मी. पाऊस झाला. त्यात भुसावळ तालुक्यात ९३.३ टक्के तर चाळीसगावमध्ये ७५.९ मि.मी पाऊस झाला अाहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरणीचे नियाेजनही काेलमडले अाहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची स्थिती अाहे. दरम्यान, दाेन दिवसांत अतिवृष्टी हाेईल, हा अंदाजदेखील फाेल ठरला असून मंगळवारी काही ठिकाणी केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात जून महिन्यात झालेला पाऊस असमान असल्याने काही ठिकाणी खरिपाची पेरणी उरकली तर काही ठिकाणी धूळपेरणी फेल गेली अाहे.

जून महिन्यात अातापर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस...
जळगाव-४९.८ मि.मी., भुसावळ- ९३.८, यावल- ३३.३, रावेर- ४१.६, मुक्ताईनगर- १६.१, अमळनेर- ३६.९, चाेपडा- १२.२, एरंडाेल- ५६.६, पाराेळा- ६४, चाळीसगाव- ७५.९, जामनेर- ४८.८, पाचाेरा- ४५.९, भडगाव- ६८.१, धरणगाव- ३५.३, बाेदवड- ३४.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा अंदाज फाेल
हवामानखात्याने या अाठवड्यात वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज फाेल ठरला असताना भारतीय हवामान विभाग पुणे यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात दमदार पाऊस हाेईल, असा अंदाज त्यांच्या संकेतस्थळावर वर्तवला अाहे. हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संकेतस्थळांवर देखील असाच अंदाज वर्तवण्यात अाला अाहे.
गिरणा पंपिग रोडवरील शेतीत पेरणी करताना शेतकरी.
बातम्या आणखी आहेत...