धुळे - महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्ष आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविणा-यांपैकी 63 जणांनी निवडणुकीत करण्यात आलेल्या खर्चाची माहिती सादर केली नाही. म्हणून निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांनी या 63 जणांना तीन वर्षासाठी निवडणुक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत साडेचारशेपेक्षा अधिक उमेदवारांकडून उमेदवारी करण्यात आली होती.
महापालिकेची तिसरी निवडणुक डिसेंबर 2013 मध्ये झाली. त्यात 165 अपक्षांसह प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मिळूना 466 जणांनी उमेदवारी केली. 70 जागांसाठी ही निवडणूक झाली. निवडणुक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार निवडणुक लढविणा-याप्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी करण्यात येणा-याखर्चाचा दैनंदिन विवरण सादर करणे बंधनकारक होते. तसेच निकालानंतर एक महिन्याच्या आत इतर सर्व प्रकारच्या खर्चाची माहिती,बिलासह सादर करावी लागते. त्यासाठी प्रशासनाकडून अधिक दिवस येऊनही अनेकांकडून खर्चाबाबतचा तपशील सादर केला गेला नाही. यामुळे खर्च सादर न करणाºयांची माहिती महापालिका प्रशासनाकडून राज्य निवडणुक आयोगाला देण्यात आली. याबाबत विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. त्यात काही उमेदवार सुनावणीस प्रत्यक्ष हजर होते तर काहीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत उमेदवारांनी निवडणुकी केलेल्या खर्चाबाबतची माहिती शपथपत्रासह मुदतीत सादर केली नाही म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे.
हे उमेदवार ठरले अपात्र
कंसात कोणत्या वार्डातून निवडणुक लढविली याची माहिती-सुनंदा चौधरी (1 अ), सुरेखा पाटील(1ब), सुरेखा ठाकरे(1 ब), गोविंद वाघ(4 ब), सरिता रोकडे( 4 ब), हजराबी पठाण( 4 ब), युवराज पाटील (5 ब), हर्षल पाटील (6 ब), प्रमिला शिंदे (7 ब), युवराज हाटकर(3 ब), जुलेखा शेख(9 अ), सुनंदा सुर्यवंशी (10 अ), लोटन माळी(10 ब), पुष्परानी सोनवणे(12 अ), संजय फुलपगारे (12 ब), सुलोचना चौधरी(21 ब), मीना गोयर (24 ब), इजीमाबी फकीर(24 ब), शाह जमीनाबी मुस्ताक(24 ब), वंदना थोरात (24 ब), फकीर फरदीबी शाह(24 ब), शेख वसीम शरीफ(25 ब), गोपाल माने(14 ब), सैय्यद आसिफ इकबाल अली( 14 ब), संतोष बागुल(15 अ), रवींद्र केदार (15 अ), शेक नुरजाबी शेख रफी(15 ब), नागसेन गांगुर्डे (16 ब), दिपमाला खरात (15 ब), राजश्री मगर (17 ब), नंदकिशोर ठाकरे (17 ब), सिंधूबाई सातपुते(18 ब), सोनाली सुर्यवंशी(18 ब), शिवाजी जाधव (30 ब), उज्वला जैन (31 ब), मालतीबाई धुलवंत(31 ब), कविता मोरे (31 ब), राजेद्र मराठे (31 ब), दयानंद चित्ते(31 ब), राजेद्र ढवळे(31 ब), हेमंत खैरनार (32 अ), सुनिता भोपे (32 ब),कुसुम पाटील(32 ब), सुलोषना मोरे (32ब), नितीन वावडे (33 ब), बळवंत गुरव(33 ब), जयवंत गांदी (34 अ), संजय मोरे (34अ), संगिता शिंदे (34 ब), सुवर्णा मिस्तरी(34 ब), अन्सारी कुरेशाबानो (27 अ), शेख सईदाबी (27 अ), जुलेखाबी अन्सारी (27 ब), दीपक वाघ (29 ब), कुरेशी चांद बी लफिक (29 ब), शेख शहाआनाबी सैय्यद(29 ब), शारदा खंडेलवाल (29ब), अन्सारी जुबेदा (35 अ), शेख मेहमुद शेख हुसैन(35 ब), उल्ला खान (35 ब), अन्सारी शरीफ (35 ब), शेख सैय्यद मुसा (35 ब), शेख कादर (28 ब).
प्रथमच झाली कारवाई
निवडणुक आचारसंहितेचे पालन यंदाच्या निवडणुकीत काटेकोरपण करण्यात आले. त्यात आचारसंहिता भंगाचे काही तक्रारीही दाखल झाले. तसेच काही जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने खर्च सादर न केल्यामुळे निवडणुक लढविण्यास तीन वर्ष बंदी घालण्याची कारवाई झाल्याने निवडणुक लढविण्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून या सर्वांना व्यक्तीगत पातळीवर आयुक्ताकडून नोटीसा पाठविल्या जाणार आहेत.
अधिनियमाप्रमाणे कारवाई
खर्च सादर न करणा-याउमेदवारांवर मुंबई प्रांतीक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10(1-ई) चे तरतूदी अन्वये कारवाई करण्यात आली. निवडणूक होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही हा खर्च सादर झालेला नाही. त्यामुळे आयोगाने त्याची दखल घेतली.