आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात दिवसांत ६६९ रेल्वे तिकिटे रद्द, थंडीमुळे रेल्वेगाड्या रद्दचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे प्रशासनाने जानेवारीपासून काही गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे ते १५ जानेवारी या काळात रेल्वेच्या भुसावळ येथील अवर्षण तिकीट खिडकीवरून, सात दिवसांत ६६९ तिकिटे रद्द झाली आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दोन लाख ५३ हजार ५६५ रुपयांचा परतावा देण्यात अाला अाहे.

उत्तर भारतात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दिल्लीकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. याच कारणामुळे रेल्वे प्रशासनाने ३६ रेल्वेगाड्या रद्द केल्या, तर फेब्रुवारीपर्यंत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. मात्र, उत्तर भारतातील धुक्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे काही गाड्यांच्या फेऱ्या नियमित झाल्या आहेत. गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केली. त्यामुळे अवघ्या सातच दिवसांत ६६९ तिकिटे रद्द झाली अाहेत. भुसावळ स्थानकावरील अवर्षण तिकीट खिडकीवरून परतावा घेण्यासाठी गर्दी झाली. दरम्यान, उत्तर भारतातील धुके कमी झाल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, १५ जानेवारीपासून काही गाड्या सुरू करण्यात अाल्या अाहेत.

१०६ विद्युत इंजिनांचे पीअाेएच : भुसावळच्या विद्युत इंजीन कारखान्यात गेल्या १० महिन्यात म्हणजेच मार्च २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान १०६ विद्युत इंजिनांचे पिराॅडीकल अाेव्हर हाॅलिंग करण्यात अाले अाहे. वर्षभरात १२८ इंजिनांचे उद्दीष्ट देण्यात अाले अाहे. लालागुडा, संत्रागाची, अजनी, कल्याण, भुसावळ, तुघलकाबाद, गाजीयाबाद, टाटानगर येथून पीअाेएचमध्ये रेल्वे इंजिन येतात. नवीन वर्षात उद्दीष्ट वाढीचेही संकेत अाहेत.