जळगाव - दहावी परीक्षेच्या निकालानंतर आता आयटीआयसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य विज्ञान शाखा उपलब्ध अाहेत. त्यासाेबत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) ही शाखादेखील उपलब्ध करून देण्यात अाली. या शाखेच्या ६९६० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार अाहे. यात शासकीय संस्थांच्या २४० जागा, तर शासकीय अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमध्येही प्रवेश क्षमतेनुसार ६७२० जागा उपलब्ध अाहेत.
केंद्र सरकारच्या १९८६च्या शैक्षणिक धाेरणानुसार +२ स्तरावर व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन युवकांना राेजगार, स्वयंराेजगार करण्यास प्राेत्साहित करण्याच्या दृष्टीने राज्यात सन १९८८-१९८९पासून ७० टक्के व्यवसाय शिक्षण ३० टक्के सामान्य शिक्षण अंतर्भूत असलेले किमान काैशल्यावर अाधारित व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले अाहेत. त्यासाठी शासनाने २००९-२०१०पासून हे नाव बदलून एमसीव्हीसी असे केले अाहे. त्याचबराेबर प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एका तुकडीत २० विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार प्रवेश देण्यात येणार अाहेत. तसेच, विद्यार्थ्यांची मागणी असल्यास अधिकच्या जागांवर संस्थांना प्रवेश देण्याचा अधिकारदेखील देण्यात अालेला अाहे. दरम्यान, अभियांत्रिकी गटातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी पदविकेच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत असल्याने व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला अाहे.
एमसीव्हीसी प्रवेशालासुरुवात झाली आहे. एकूण ६९६० जागांवर प्रवेश दिले जातील. - एन.बी.अहिरे, वरिष्ठ साहाय्यक, व्यवसाय शिक्षण विभाग