आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विळ्याचा धाक दाखवत बलात्‍कार केल्‍याप्रकरणी आरोपीस 7 वर्षांची शिक्षा, जळगावमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- विळ्याचा धाक दाखवत शेतात नेऊन बलात्कार केल्‍याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस 7 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीचे नाव रविंद्र दिनकर आहे. दुष्‍कृत्‍य केल्‍यानंर पिडीतेच्‍या अंगावरील दागिनेही आरोपीने काढुन घेतले होते. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे ही घटना घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी शनिवारी हा निकाल दिला.  
 
सविस्‍तर माहिती अशी की, 22 मे 2016 रोजी पीडित महिला (वय 45) भावाच्या घरी गुरांना चारापाणी करीत होती. तेव्‍हा आरोपीने हातातील विळ्याच्या धाक दाखवत घरामागील शेतात पिडीतेला नेले व दारूच्या नशेत बलात्कार केला. त्‍यानंतर आरोपीने पिडीतेच्‍या अंगावरील सोन्याचांदीचे दागिनेही काढून घेतले.  
 
याबाबत 23 मे 2016 रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी एपीआय सुजित ठाकरे यांनी तपास पूर्ण करून अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणी सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी खटल्याचे काम पाहिले. यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात बलात्कार झालेल्‍या जागेचा पंचनामा, डॉक्टरांचा जबाब, फिर्यादीच्या अंगावरील विकेलेले दागिने घेणाऱ्या सराफ यांची साक्ष महत्वाची मानली गेली. त्‍यानुसार कलम 376 प्रमाणे 7 वर्षे शिक्षा व 15 हजार रुपये दंड व कलम 392 प्रमाणे दागिने प्रकरणी 3 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, कलम 354 प्रमाणे 2 वर्षे अशी एकत्र सात वर्षे शिक्षा व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा आरोपीला ठोठावण्‍यात आली. तसेच सदर प्रकरणातील चोरलेले दागिने पिडीतेस परत देण्याचे आदेश न्या. दिनेश कोठलीकर यांनी दिले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...