आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 75 Crores May Award To Women Hospital In Jalgaon

जळगावातील महिला रुग्णालयास ७५ काेटी मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोहाडी येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ७५ कोटी ३१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास बुधवारी मान्यता दिली. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्त्री रुग्णालयाच्या प्रस्तावाला चालना दिली होती. यासाठी मोहाडी येथे जिल्हा प्रशासनाने सहा एकर जागाही दिलेली आहे. या रुग्णालयात मुख्य इमारत, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश असणार अाहे. तसेच या निधीत पाणीपुरवठा, विद्युतीकरण यासाठी तरतूद करण्यात अाली आहे.
रुग्णालयाच्या उभारणीसंदर्भात रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी शासनास सादर करावा,असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये या रुग्णालयासाठी मोहाडी शिवारातील गट क्रमांक २० मध्ये सहा एकर जागा निश्चित करण्यात आली. जागा मंजुरीनंतर पालकमंत्री एकनाथ खडसे यांची १० मार्च रोजी राज्याचे आरोग्य मंत्री सचिव यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.