आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपलेल्या वृद्धेच्या उशीखालून चोरली ७५ हजारांची सोनसाखळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(श्वानाला साकळी हुंगवताना पोलिस कर्मचारी.)

जळगाव - गणपती नगरात घरात एकटी झोपलेल्या वृद्ध महिलेच्या उशीखालून चोरट्यांनी ७५ हजारांची सोनसाखळी पर्समधील हजार रुपये लंपास केल्याची घटना रविवारी रात्री वाजेच्या सुमारास राठी उद्योगच्या आवारातील घरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

आहे. या घरात त्यांच्या आई नारायणीबाई राठी (वय ८६) या एकट्या राहतात. तर कांतिलाल राठी हे महाबळमधील विद्युतनगरात राहतात. ही संधी साधून चोरट्यांनी रविवारी रात्री वाजता नारायणीबाई झोपलेल्या घरात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी घराच्या पूर्वेला असलेली सिमेंटची खिडकी तोडली. त्यानंतर स्वयंपाकाच्या ओट्याजवळ असलेल्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला. (मात्र खिडकी छोटी असल्याने लहान मुलाला त्यातून आत पाठवून दरवाजाची कडी उघडून चोरटे घरात शिरल्याचा पोलिसांचा संशय आहे.) त्यानंतर चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केला. मात्र, चोरट्यांना कपाटात काहीच सापडले नाही. म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा पहिल्या खोलीत झोपलेल्या नारायणीबाईंकडे वळवला. त्यांच्या उशीखाली साडेतीन तोळ्याची ७५ हजाराची सोनसाखळी पर्समध्ये हजार ठेवलेले होते चोरट्यांनी लंपास केले.

चोरट्यांनीमेन स्विच केले बंद
चोरट्यांनी चोरी करण्याआधी घरातील विजेचे मेन स्वीच बंद केल्याने कुलर, फॅन बंद झाले. त्यामुळे पहाटे वाजता नारायणीबाईंना जाग आली. त्यांनी उठून बघितल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पाहिले. घरातील जेवणाच्या प्लेट जागेवर नव्हत्या. फ्रीज उघडा होता. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ वॉचमनला बोलावून चोरीबाबत सांगितले. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता मुलास चोरी झाल्याचे कळवले. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलिसांना चोरीबाबत माहिती दिली. घटनास्थळाला पोलिस उपअधीक्षक किशोर पाडवी, पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी भेट दिली. तसेच श्वान पथक आले पण ते जागीच घुटमळले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी एका हिस्ट्रीशीटरला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
चोरट्यांनी याच दुचाकीचे चाक लांबवले

अंगावरील हि-यांचे दागिने वाचले
नारायणीबाईंनी मांजर पाळली आहे. रात्री, बेरात्री मांजर त्यांच्या अंगावर उड्या मारत असते. त्यामुळे चोरट्यांनी उशी खालून सोनसाखळी काढली. त्या वेळी त्यांना मांजर असल्याचा भास झाला. आजीबाईंच्या कानात सोन्याचे तर नाकात हि-यांचे दागिने होते. सुदैवाने चोरट्यांचे त्याकडे लक्ष गेल्याने ते वाचले.
वॉचमनअसतानाही घरात झाली चोरी
राठीवेस्ट स्पिनिंग प्लांट महापालिकेच्या हद्दीत आल्याने तो बंद करावा लागला. त्यामुळे राठी परिवाराने जमीन खरेदीचा व्यवसाय सुरू केला. कांतीलाल राठी त्यांची पत्नी रेखा राठी आणि मुले विद्युतनगरीत राहतात. मात्र, त्यांची आई नारायणीबाई त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. तेथे रतन साळुंके नावाचा वॉचमन आहे. तसेच आवारातील एक खोली नेपाळी तरुणांना दिली आहे. तरी देखील चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.