आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७५ वृक्ष तोडण्यासाठी प्राधिकरणाची मान्यता!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पाेलिस प्रशिक्षण केंद्रातील बांधकामाला अडथळा ठरणारी २५, वैभवनगरातील शंभर फुटी राेडच्या मागील खासगी ४० सागाच्या वृक्षांसह अन्य ठिकाणी असलेल्या ७५ वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तर अन्य दाेन वृक्षताेडीचे विषय तहकूब ठेवण्यात आले. महापालिका सभागृहात वृक्ष प्राधिकरण समितीची सभा उपायुक्त तथा समितीचे सचिव त्र्यंबक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपायुक्त हेमलता डगळे, सहसचिव सराेदे आणि समितीतील केवळ सहा सदस्य उपस्थित हाेते.

सभेच्या विषयपत्रिकेवर १४ विषय हाेते. त्यात बहुतेक वृक्षताेड आणि वृक्षांचा भार कमी करण्याचा विषय हाेता. त्यानुसार पाेलिस प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामात अडथळा येत असलेले सुबाभूळ (पाच), काटेरी बाभूळ (पाच), काशिद (पाच), वाळलेले िनंब (चार), निंब, चिंच (प्रत्येकी तीन) असे एकूण २५ वृक्ष ताेडण्याची परवानगी मागितली हाेती. त्याला मंजुरी देण्यात आली. तसेच विराेधी पक्षनेता संजय जाधव यांनी त्यांच्या प्रभागातील व्ही.आर. राणा यांच्या घरामागील सागाची ४० वृक्ष काढण्याचे पत्र िदले हाेते. त्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय अशाेक नगरातील सुरेश साेनवणे यांची तीन सागाची, मनपाच्या गांडूळखत प्रकल्पातील चार वाळलेली िनंबाची झाडे, श्रीदत्त कृपा काॅलनीतील गटारीच्या बांधकामास अडथळा ठरणारे एक असे एकूण ७५ वृक्ष ताेडीस सभेत मंजुरी दिली गेली. तर अन्य विषय वीजतारांना अडथळा ठरणारे आणि बांधकामाला नागरिकांच्या जीवास धाेका ठरणार्‍या वृक्षांचे भार कमी करण्याचे हाेते. त्याला मंजुरी दिली गेली.

लागवडीचा विषयच नाही
वृक्षप्राधिकरणाने केवळ वृक्ष तोडायला मान्यता दिली आहे. त्याबदल्यात संबंधित व्यक्ती पाच झाडे लावणार आहे का, लावणार असेल तर त्यासाठी जागा आहे का, यावर चर्चा झाली नाही. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. लोक बांधकामासाठी झाडे तोडतात. मात्र, नवीन झाडे लावली जात नाहीत. महापालिकेच्या मोकळया जागांमध्ये वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. मात्र तेही केले जात नाही. पावसाळा एक महिन्यावर आहे. त्याचे नियोजन नाही.

दाेन विषय ठेवले तहकूब
सभेत१४ विषयांवर चर्चा झाली. त्यातील दाेन विषय तहकूब ठेवण्यात आले. त्यात रेडक्राॅसराेडवरील हरीश शहा यांच्या मालकीचे दाेन निंबाची झाडे पूर्ण काढण्याच्या अर्जावर त्रिसदस्यीय समितीने समक्ष पाहणी केली हाेती. तरीही त्याला सदस्यांनी विराेध केल्याने हा िवषय तहकूब ठेवला गेला. तर आदर्श काॅलनीतील हितेश विसपुते यांच्या निवासस्थानाजवळील वृक्ष काढण्याबाबत समितीने अहवाल दिल्याने हा विषयही तहकूब ठेवला गेला.
सदस्यांना विषयाचे गांभीर्य नाही
समितीत१४ सदस्यांचा समावेश असताना बुधवारच्या सभेला केवळ चार महिला दाेन पुरुष असे एकूण सहा सदस्य उपस्थित हाेते. तर एका सदस्याकडून रजेचा अर्ज देण्यात आला हाेता. अन्य सदस्य काेणतीही सूचना देता गैरहजर हाेते. सध्या पर्यावरणाबाबत सर्वत्र जागरूकता निर्माण झाली असताना वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांमध्ये गांभीर्य नसल्याचे िचत्र आजच्या गैरहजेरीवरून िदसून आले. शहरात बांधकाम करताना काही ठिकाणी खुलेआम झाडांची तोड करण्यात आली. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्याची चौकशीसुद्धा प्रािधकरणाने केलेली नाही, ही गंभीर बाब ठरली आहे.