आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गोटेंची तक्रार; 8 कर्मचाऱ्यांची बदली; आजपासून स्विकारणार नवीन ठिकाणचा पदभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जिल्हा बँकेचे कर्मचारी बँकेचे काम करता माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी राबतात, असा आरोप करून शहराचे आमदार अनिल गोटे यांनी सहकार विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा बँकेतील आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी बदलीचे आदेश काढले असून, उद्या बुधवारी या आठही कर्मचाऱ्यांना नवीन जागेवर रुजू व्हायला सांगितले. धुळे नंदुरबार जिल्हा बँकेच्या आठ कर्मचाऱ्यांबाबत आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतला होता. सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून बँकेचे सीईओ धीरज चौधरी यांनी आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशानुसार आमदार अनिल गोटे यांनी दि. जून २०१४ रोजी सहकार विभागाच्या सचिवांकडे केलेल्या तक्रारीनुसार झालेल्या आदेशान्वये तातडीने बदली करण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी कार्यालयीन वेळेनंतर आपल्याला कार्यमुक्त करण्यात येत आहे.
बुधवारी (दि. १९) बदलीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अहवाल मुख्य कार्यालयाला सादर करावा. त्यानुसार आठपैकी चार कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आपला पदभार सोडला होता. बदली झालेल्यांमध्ये प्रशासनातील दोन ज्युनिअर ऑफिसर, दोन असिस्टंट चार शिपायांचा समावेश आहे.

^ कर्मचाऱ्यांनी इतरत्र कामे केली त्यांच्या पगाराचा भुर्दंड बॅँकेला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही बॅँक बुडाली आहे. या कर्मचाऱ्यांकडून पगारापोटी घेतलेला सगळा पैसा वसूल करायला हवा. अजूनही काही जण नंदुरबारच्या माजी अध्यक्षांकडे राबत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी. अनिल गोटे, आमदार धुळे शहर

यांची बदली (कंसात ठिकाण)
१) हेमंत जगतराव पाटील, ज्युनिअर ऑफिसर, मुख्य कार्यालय, प्रशासन, (शिरपूर शाखेतील तपासणीस यांचे मदतनीस), २) अनिल मडकू चौधरी, असिस्टंट, मुख्य कार्यालय, प्रशासन, (शिंदखेडा शाखेचे तपासणीस यांचे मदतनीस), ३) गुलाब महादू कोकणी, असिस्टंट, (मुख्य कार्यालय आयटी सेल येथे टायपिस्ट), ४) रवींद्र भगवान शिवदे, ज्युनिअर ऑफिसर, प्रशासन, (मुख्य कार्यालय कर्ज येथे टायपिस्ट), ५) आनंदा काशिराम उशिरे, शिपाई मुख्य कार्यालय (मुख्य कार्यालयात रात्रपाळी शिपाई), ६) दत्तात्रय बबनराव नऱ्हेराव, शिपाई, मुख्य कार्यालय ( नवलनगर शाखा येथे शिपाई), ७) विनोद रामदास अहिरे शिपाई, देवपूर शाखा, (नगाव शाखा येथे शिपाई), ८) सतीश दगा महाले, (गरताड शाखा येथे शिपाई).