आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढीसाठी पंढरपूरला ८० जादा बसेस ,परतीचा प्रवासाला मिळेल बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जिल्हाभरातून १० दविसांत ८० जादा बसेसची व्यवस्था परविहन महामंडळाने केली आहे. तसेच पंढरपूरहून जळगावसाठीही विशेष बसची सुविधा महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

राज्य परविहन महामंडळातर्फे प्रतविर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रोत्सवासाठी २३ जुलै ते ऑगस्टदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. आषाढीसह गुरू पौर्णिमेसाठी या जादा बसेस सुरू राहणार आहेत. यात्रेच्या १० दविसांत अधिक उत्पन्न मिळवण्याचे नियोजनही महामंडळाने केले आहे. गेल्या काही दविसांपासून सातत्याने रेल्वेगाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांचा ओढा आता एसटी प्रवासाकडे वळणार आहे. याचा लाभही एसटी महामंडळास मिळणा-या अधिकच्या उत्पन्नातून होणार आहे.

येथून असतील जादा बसेस
जळगाव,यावल, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा, भुसावळ, एरंडोल या बसस्थानकावरून पंढरपूर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासह पंढरपूर येथून भाविकांना परत येण्यासाठी खास बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रुपसाठी बसेस उपलब्ध
भाविकप्रवासी ग्रुपसाठी महामंडळाने थेट पंढरपूर जाण्यासाठी बसची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. परंतु, यासाठी निश्चित प्रवासी उपलब्ध असणे गरजेेचे आहे. पंढरपूर येथून ज्या भाविक प्रवाशांना दर्शन घेऊन परत यायचे असेल त्यांनी परतीचे तिकीट काढल्यास पंढरपूरकरिता बसेस उपलब्ध राहणार आहेत.

पाऊस लांबल्याने यात्रेवर सावट
महिन्याभरापासूनपावसाने दडी मारल्याने पेरण्या रखडल्या आहेत. याचा परिणामही भाविकांच्या पंढरपूर येथील उपस्थितीवर होणार आहे. जुलै महिन्याच्या मध्यंतरापर्यंत पाऊस नसल्याने खरीप हंगामाबाबत सर्वांनाच िचंता आहे. याचा परिणाम मजूर, व्यावसायिकांवरही होईल. त्यामुळे यात्रेकरूंच्या संख्या रोडावण्याची भीतीही व्यक्त होत आहे.