आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

८०० मालमत्ताधारकांची बँक खाती सील हाेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन वर्षात तिसऱ्यांदा बँक खाती सीलच्या कारवाईला सामाेरे जाणारी महापालिका अाता मालमत्ता थकबाकीदारांच्या मानगुटीवर बसणार अाहे. २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादी तयार करण्यात अाली अाहे. शहरातील सुमारे ८०० जणांचा समावेश यात अाहे. शहरातील बंॅकांना पत्र देऊन थकबाकीदारांची बंॅक खाती सील करण्याचे अादेश दिले अाहेत.

नाशिक विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अायुक्तांनी नाेटीस देऊन मनपाची बँक खाती सील केली अाहेत. त्यामुळे अडचणीत अालेल्या प्रशासनाने अाता अापल्याच हक्काचा पैसा बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या करदात्यांवर कारवाईचा निर्णय घेतला अाहे. शहरातील २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची यादी तयार केली अाहे. प्रभाग मधील २०८ जणांची यादी तयार करण्यात अाली अाहे. ही यादी शहरातील सर्व बंॅकांना देऊन त्यांच्याकडे खाती असल्यास ते सील करण्याची विनंती करण्यात येणार अाहे.

प्रभागाची माहिती संकलन
प्रभाग अधिकारी विलास साेनाेनी यांच्याकडील थकबाकीदारांच्या यादीत २०८ जणांची नावे अाढळून अाली अाहेत. याप्रमाणेच अन्य तिन्ही प्रभागात सुमारे ६०० बडे थकबाकीदार असण्याची शक्यता अाहे. त्यामुळे महिनाभरात सुमारे ८०० जणांवर कारवाईची कुऱ्हाड काेसळणार हे जवळजवळ निश्चित झाले अाहे. सद्या महापालिकेची २५ काेटींची थकबाकी थकलेली अाहे. यात सुमारे १० काेटी रुपये वादग्रस्त अाहे.

संधीदेऊन केले दुर्लक्ष : मालमत्ताकर संकलन विभागाची काही मिळकतधारकांवर वर्षानुवर्षे मालमत्ताकराची थकबाकी अाहे. अशा मिळकतधारकांना वारंवार नाेटीस बजावूनही त्यांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात अाले अाहे. पालिका अार्थिक अडचणीत असतानाही थकबाकीदार प्रशासनाला दाद देत नसल्याने अाता त्यांचे बँक खाते सील करण्याचा निर्णय घेतला अाहे.

कारवाई अटळ अाहे
महापालिकेची बँक खाती सील हाेण्याची कारवाई सुरू अाहे. त्यामुळे अाता प्रशासनासमाेर पर्याय उरलेला नाही. थकबाकीदारांना अनेक वेळा नाेटीस बजावूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे थकबाकीदारांचे बँक खाते सील करण्याची कारवाई करावी लागत अाहे. प्रदीप जगताप,